*खेडभोसे येथील ग्रामसभेत महिलांनी पुकारला दारूबंदीचा एकमुखी एल्गार:-*
--------------------------------------------------------------------------------
कायदा सुव्यवस्था सांभाळणारे पोलीसदादा काय निर्णय घेणार ?
--------------------------------------------------------------------------------खेडभोसे गावात दारू बंदीचा निर्णय ग्रामस्थांचा एकमुखी ठराव.
पंढरपूर प्रतिनिधी:- तालुक्यातील खेडभोसे गावात संपूर्ण दारू बंदी करण्याचा निर्णय ग्रामसभेत बहुमताने घेण्यात आला आहे. मात्र पोलिस प्रशासन या निर्णयाला कसा प्रतिसाद देतात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.
दि.११ सप्टेंबर रोजी ग्रामसभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सज्जन लोंढे होते. यावेळी उपसरपंच छाया पवार, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक कालिदास साळुंखे, सोसायटीचे माजी चेअरमन अशोक पवार, ग्रामपंचायत सदस्य शहाजी जमदाडे, पोलिस पाटील नंदिनी गवळी, माजी उपसरपंच सिध्देश्वर पवार, सुरेश पवार, बंडू पवार, संतोष पवार, ग्रामसेवक व्ही. बी. गायकवाड, कृषी अधिकारी श्री. गुंड, वैद्यकीय अधिकारी श्री गवळी, विकास पवार उपस्थित होते.
या ग्रामसभेत अनेक विषय चर्चेला ठेवण्यात आले होते. मात्र गावात संपूर्ण दारू बंदी हा विषय गाजला. गावात खुलेआम दारू विक्री होत असल्यामुळे अनेक तरुण व्यसनाधीन बनले आहेत. अनेक घरात भांडणे होत आहेत. यासर्व प्रकाराला ग्रामस्थ वैतागले होते.
यापूर्वीही गावात संपूर्ण दारू बंदी करण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला होता, मात्र तरीही गावात खुलेआम दारू विक्री सुरूच होती. आताही नव्याने दारू बंदीचा ठराव करण्यात आला असून पोलिस प्रशासनाकडून या ठरावाची कशा प्रकारे अमंलबजावणी होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.
या ग्रामसभेसाठी बालाजी पवार, तानाजी पवार, सज्जन पवार, पप्पू साळुंखे, गणेश पाटील, राजकुमार जमदाडे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.