शिष्यवृत्ती परीक्षेत यशवंत विद्यालयाची यशाची परंपरा कायम.

शिष्यवृत्ती परीक्षेत यशवंत विद्यालयाची  यशाची परंपरा कायम.

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर:( दै .पंढरी नगरी न्यूज)पंढरपूर येथील यशवंत विद्यालयामध्ये घेण्यात आलेल्या शालेय शिक्षण विभागाकडून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ८ वी परीक्षेमध्ये यशवंत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.या परिक्षेमध्ये इ. ५ वी मधील  २४ विद्यार्थी तर इ. ८ वी मधील १७ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत.

गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवरती शाब्बासकीची थाप म्हणून विद्यालयांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जनरल बॉडी सदस्य  डॉ.राजेंद्र जाधव, व स्थानिक स्कुल समिती सदस्य, आनंदराव थिटे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ ए. के. साळवे ,वरिष्ठ लेखनिक  पी. व्ही. गोंजारी  वरिष्ठ शिक्षक . जी. आर.नलवडे  यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

तसेच सर्व पालक वर्गातून शिष्यवृत्ती विभागप्रमुख .आर.बी ऐवळे व जी. एस. कानडे  आणि त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या यशाबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे या सत्कार प्रसंगी विद्यालयातील सर्व सेवक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.