मंगळवेढा पोलिसांकडून रु ४०,०००/- किमतीचा 2 किलो ०१८ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त
---------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (पंढरी नगरी न्यूज ) : मंगळवेढा पोलीस ठाणे गु र नं 343/2023 गुंगिकारक औषधीद्रव्ये मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) (ब) या याप्रमाणे गुन्हा दाखल असुन फिर्यादी नामे दयानंद दादासाहेब हेंबाडे वय ३६ वर्षे, पोहवा बनं १६९७ नेमणुक मंगळवेढा पोलीस स्टेशन यांनी आरोपी नामे किरण पांडुरंग भिसे वय २२ वर्षे रा- बेगमपुर, ता- मोहोळ, जि- सोलापुर याचे ताब्यामध्ये २ किलो ०१८ ग्रॅम वजनाचा गांजा मौजे ब्रम्हपुरी येथील एचपी पेट्रोल पंपाच्यासमोर सोलापुर ते मंगळवेढा रोडवर मिळुन आल्याने वरीलप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक रणजीतसिंह माने यांना गोपणीय माहीती मिळाली की ब्रम्हपुरी येथे एक इसम गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे. मिळालेल्या गोपणीय माहीतीच्या आधारे गोपणीय एनडीपीएस कायदयातील तरतुदींचे पालन करुन सोबत सपोनि पिंगळे, पोहवा हेंबाडे, पोशि घायाळ, पोशि मिसाळ, पोशि राऊत दोन पंच व फोटोग्राफर व तोलार यांचेसह दि ३०/०४/२०२३ रोजी १९/५१ वा ते २२/०० वा दरम्यान रेड करणेकामी ब्रम्हपुरी येथील एचपी समोर जावुन सदर इसमाची झडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये एकुन ४०,०००/- रुपये किमतीचा अमली पदार्थ गांजा २ किलो ०१८ ग्रॅम वजनाचा जप्त करण्यात आला. आरोपी नामे किरण पांडुरंग भिसे वय २२ वर्षे रा- बेगमपुर, ता- मोहोळ, जि. सोलापुर यांचे विरोधात गुन्हा नोंद केला आहे. दाखल गुन्हयातील आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि बापुसाहेब पिंगळे हे करित आहोत.
सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण श्री. शिरीष सरदेशपांडे सो, अपर पोलीस अधिक्षक श्री हिंमतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीतसिंह माने, मंगळवेढा पोलीस ठाणे, सपोनि बापु पिंगळे, पोहेकॉ / दयानंद हेंबाडे, पोकॉ वैभव घायाळ, पोकॉ अजित मिसाळ यांनी सदरची कामगिरी केली आहे.