मंगळवेढा पोलीस ठाणेकडील पोलीसांची कौतुकास्पद मोठी कामगिरी,दिवसा घरफोडी करणारे सराईत स्थानिक गुन्हेगार जेरबंद..
------------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा( दै.पंढरी नगरी न्यूज) मंगळवेढा पोलीस ठाणेकडील १२ घरफोडीचे व ०२ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस १२ लाख ५० हजार रु. किमतीचे सुमारे २५ तोळ्याचे सोन्याचे दागिने व १ लाख रुपये किमतीच्या ०२ मोटर सायकली केल्या जप्त.
------------------------------------------------------------------------------------
एकुण १३ लाख ५० हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त :-
------------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा शहरामध्ये साधारपणे जानेवारी महीन्यापासुन सायंकाळी ०६:०० ते ०८:०० वाचे सुमारास शिक्षक कॉलणी, मित्रनगर, वनराई कॉलणी, सप्तशृगी नगर, नागणेवाडी, चैतन्य कॉलणी, बनशंकर कॉलणी तसेच ग्रामीण भाग अशा ठिकाणी अचानकपणे दिवसाचे घरफोडीचे सत्र सुरू झाले होते. सदर घरफोडी थांबवण्यासाठी पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी वेळो वेळी मंगळवेढा पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार गुन्हे उघडकीस आणनेकरीता सुचना व मार्गदर्शन केले होते. त्या प्रमाणे मंगळवेढा पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार कसोशीने प्रयत्न करीत होते. त्यामध्ये रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेक करणे, नाकाबंदी करणे, तांत्रीक विश्लेषनाचे आधारे तपास करणे, सांगोला, पंढरपुर, मोहोळ, अकलुज, सोलापुर शहर तसेच महाराष्ट्रातील व परराज्यातील गुन्हेगारांचा कार्य पध्दतीचा अभ्यास केला होता मात्र काहीएक सुगावा लागत नव्हता.
त्यामुळे पुन्हा स्थानिक गुन्हेगारांकडे लक्ष दिले असता तांत्रीक बाबीचे व गोपणीय बातमीदारामार्फत मिळणारी माहीती यांचे आधारे खालील दोन संशयीत इसमांची नावे मिळुन आली होती.
आरोपींची नावे -
प्रदिप धनाजी बाडे रा. जुना ढवळसरोड, मंगळवेढा ता. मंगळवेढा जि. सोलापुर
अजित बरु मेटकरी धर्मगावरोड, मंगळवेढा ता. मंगळवेढा जि. सोलापुर
त्या संशयीत व्यक्तीचा गुप्तपणे अभ्यास चालु ठेवला असता अलीकडील काळात ते कोठे येत जात होते, तसेच त्यांनी काय खरेदी विक्री केली, त्यांच्या रोजच्या हालचालीवर बारकाईने नजर ठेवून त्यांची माहीती काढुन त्यातुन सदरच्या घरफोडी व मोटरसायकल चोरीचे गुन्हे याच दोघांनी केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर संशयीत इसमांना ताब्यात घेवुन कसोशीने चौकशी करून व त्यांना विश्वासात घेवुन अधिक चौकशी केली असता त्यांनी खालील गुन्हयाची कबुली दिली आहे.
वरील घरफोडीमधील १२ लाख ५० हजार रूपयांचा मुदेमाल व मोटारसायकल चोरीमधील १ लाख रूपयेचा मुद्देमाल असा एकुण १३ लाख ५० हजार रूपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच सदर आरोपींकडे अजुन तपास चालु असुन आणखी काही गुन्हे उघडकीस येणेची शक्यता आहे.
सदरची कामगिरी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सो सुनिल फुलारी, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर. मा. पोलीस अधीक्षक श्री शिरीष सरदेशपांडे, सोलापुर ग्रामीण, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील मॅडम, मंगळवेढा विभाग, पोलीस निरीक्षक सुहास जगताप, स्थानीक गुन्हे शाखा सोलापुर ग्रामीण यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक रणजीतसिंह माने मंगळवेढा पोलीस ठाणे, सपोनि / अंकुश वाघमोडे, सपोनि / सत्यजित आवटे, पोहेकॉ / दयानंद हॅबाडे, पोहेकॉ / हजरत पठाण, पोना / सुनिल मोरे, पोकॉ / अजित मिसाळ, पोकॉ/ अजय शिंदे, पोकॉ / खंडाप्पा हत्ताळे, पोकॉ/ कैलास खटकाळे सायबर पोलीस ठाणेकडील पोना / युसुफ पठाण यांनी गुन्हयातील आरोपी पकडुन कैशल्यपुर्ण तपास करून गुन्हयातील गेला माल हस्तगत करण्यास व तपासकामी मदत केली आहे.