संत दामाजी कारखान्याची प्रगती करणे ही स्व .कि रा .मर्दा यांना खरी श्रध्दांजली ठरेल - प्रा. शिवाजीराव काळुंगे
------------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (पंढरी नगरी न्यूज )ः- श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. किसनलाल रामचंद्र मर्दा उर्फ मारवाडी वकीलसाहेब यांच्या १०७ व्या जयंतीनिमीत्त कारखाना कार्यस्थळावर धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे, कारखान्याचे विद्यमान चेअरमन. श्री. शिवानंद पाटील, व्हा. चेअरमन श्री. तानाजीभाऊ खरात यांचे हस्ते स्व.किसनलाल रामचंद्र मर्दा उर्फ मारवाडी वकीलसाहेब व संस्थापक व्हा .चेअरमन स्व .रतनचंद शहा यांचे पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

सदर प्रसंगी बोलताना प्रा .शिवाजीराव काळुंगे म्हणाले कि, स्व किसनलाल रामचंद्र मर्दा उर्फ मारवाडी वकीलसाहेब यांनी कारखान्याचे चेअरमन म्हणुन काम करीत असताना कारखान्याचा कारभार लोकाभिमुख करुन दाखविला. त्यांचा आदर्श घेवुन सध्या आर्थिक अडचणीत असलेल्या कारखान्याचा विकास करणेसाठी विद्यमान चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ काटकसर करुन कामकाज करीत आहे. ऊस पुरवठा करणाया शेतऱ्याची ऊस बीले, तोडणी वाहतुक ठेकेदार यांची कामाची बीले, व्यापारी देणी, कर्मचारी यांचे पगार वेळेवर करुन हंगामासाठी घेतलेल्या बँकांची कर्जे वेळेवर परतफेड केलेने या संचालक मंडळावर सर्वांचा विश्वास आहे. यापुढेही कारखान्याचे कामकाज व्यवस्थीत करुन प्रगती केल्यास संस्थापक चेअरमन स्व मारवाडी वकिलसाहेब यांना खरी श्रध्दांजली ठरेल तसेच साखर कारखानादारी चांगली चालवायाची असेल किंवा स्पर्धेत टिकावयाचे असेल तर कर्मचायांनी ही डोळ्यात तेल घालून काम करण्याची वेळ आली असलेचे मत त्यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी कारखान्याचे संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, प्र .कार्यकारी संचालक रमेश जायभाय तसेच मनोज ठेंगील, हनमंत रोकडे यांचेसह कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, सभासद, शेतकरी उपस्थित होते.