रावगाव येथील राजीव गांधी सार्वजनिक वाचनालयात कवी कुसुमाग्रज वि. वा. शिरवाडकर जयंती निमित्त मराठी राजभाषा गौरव दिन साजरा..

रावगाव येथील राजीव गांधी सार्वजनिक वाचनालयात कवी कुसुमाग्रज वि. वा. शिरवाडकर जयंती निमित्त मराठी राजभाषा गौरव दिन साजरा..

------------------------------------------------------------------------------------

करमाळा (पंढरी नगरी न्यूज ) राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय रावगाव ता.- करमाळा येथे ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांच्या 112 व्या जयंतीनिमित्त "मराठी राजभाषा गौरव दिन" साजरा करण्यात आला.
यावेळी प्रतिमा पुजन जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा रावगाव चे मुख्याध्यापक बबन पाटोळे यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी त्यांनी उपस्थित मुलांना "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,जाहालो खरेच धन्य ऐकतो मराठी,धर्म, पंथ,जात,एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी.  याविषयावर मार्गदर्शन केले तसेच जिवनात वाचन किती महत्वाचे आहे या विषयावर सहशिक्षक महेंद्र शिंदे यांनी मार्गदर्शन केले यावेळी ग्रामस्थ, वाचक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार सचिव भास्कर पवार यांनी मानले.