*वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा:-*

*वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा:-*

----------------------------------------------------------------------------------
वार्षिक सभेस उपस्थित राहण्याचे काळे यांचे सभासदांना आवाहन.
..............................................…...........................…........

भाळवणी प्रतिनिधी:- चंद्रभागा नगर भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाची  अधिमंडळाची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक ३०/९/२०२२ रोजी सकाळी ११:०० वा.वाजता कारखान्याचे कार्यस्थळावर विविध विषय विचार विनिमय साठी करण्याकरिता बोलविण्यात आली असून कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजारराव आसबे यांनी दिली.

या मध्ये दिनांक ३०/९/२०२१रोजीचे आधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे. सन १/४/२०२१ ते ३१/३/२०२२ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षातील कामकाजाबाबत मा.संचालक मंडळाने तयार केलेला अहवाल तसेच सदर वर्षाचा ताळेबंद नफा व तोटा पत्रक स्वीकारून मान्यता देणे.दि.१/४/२०२१/ दि.३१/३/२०२२याअखेरच्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेऊन सन २०२०/२०२१ च्या वर्षाच्या लेखापर्यंत परीक्षणाचा दोष दुरुस्ती अहवाल स्वीकारून मान्यता देणे.

सन २०२१ ते २०२२ या आर्थिक वर्षाचे महसुली व भांडवली अंदाजा पत्र अपेक्षा कमी जास्त झालेल्या खर्चाची नोंद घेऊन त्यास मान्यता देणे .सन २०२३-२०२४या आर्थिक वर्षाकरिता तयार केलेल्या महसुली व भांडवली अंदाजपत्रकाची नोंद घेऊन त्यास मान्यता देणे. व निधी उभारणी करिता सुचवलेल्या उपाययोजनांची नोंद घेणे.

सन २०२२ -२०२३ या आर्थिक वर्षाच्या वैधानिक लेखापरीक्षणासाठी शासनमान्य लेखापरीक्षकांच्या नाम तालितेतून लेखापरीक्षकांची नेमणूक करणे व त्याचे लेखापरीक्षण शुल्क ठरवणे. सन २०२२-२३मधील इन्कम टॅक्स ऑडिट व कन्सल्टन्सी जीएसटी ऑडिट व कन्सल्टन्सी कॉस्ट व एनर्जी ऑडिट कामाकरिता कन्सल्टंट ऑडिटर यांची नियुक्ती करणे व मेहनताना ठरविणे.

सन २०-२१-२२ या आर्थिक वर्षातील स्टोअर मालाच्या घट तुटीस तसेच निकामी झालेली साहित्य रायटॅक्स ऑफ करण्यास मान्यता देणे. सन २०२१ -२२मध्ये ही ॲक्शन द्वारे विक्री केलेल्या स्क्रॅप मटेरियलची नोंद घेऊन त्यास मान्यता देणे .सन २०-२१-२२ या वर्षाच्या अधि मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गैरहजर राहिलेल्या सभासदांच्या आलेल्या अर्जावर निर्णय घेणे.शेवटी अध्यक्षांच्या पूर्व परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयाबाबत विचार करणे.

इत्यादी विषय पत्रिका वार्षिक सर्वसाधारण सगळी पुढे ठेवण्यात आले असून कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी सभासद बंधू भगिनींनी या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचेआवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजारराव आसबे यांनी केले.