गादेगाव येथील शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन..

गादेगाव येथील शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज  मध्ये शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन..

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) : पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील शिवरत्न पब्लिक स्कूल जुनिअर कॉलेज यांच्यावतीने क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले .यावेळी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध डॉ. मोहन शेवाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले .यावेळी विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा स्पर्धेविषयी मोठा उत्साह दिसत होता. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा क्षेत्राविषयी आवड निर्माण व्हावी त्यांच्या अंगी विविध खेळांचे महत्त्व निर्माण व्हावे या उद्देशाने दरवर्षी क्रीडा सप्ताह चे आयोजन करण्यात येते अशी माहिती गणपत मोरे यांनी दिली.

यावेळी डॉ. मोहन शेवाळे यांनी विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या उद्घाटन प्रसंगी सर्जेराव  मासाळ .संस्थापक अध्यक्ष उपसरपंच गणपत मोरे .सहशिक्षित शितल मस्के ,लीना बागल ,शीतल बागल ,प्राजक्ता मस्के ,पौर्णिमा साठे ,अजय मोरे व शिक्षक वर्ग उपस्थित होता. यावेळी संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी विद्यार्थ्यांना खेळांचे नियम व खेळाविषयी मार्गदर्शन केले या क्रीडा स्पर्धामध्ये लिंबू चमचा ,पोती उड्या, १०० मीटर धावणे, संगीत खुर्ची, थ्रो बॉल, लांब उडी, खो-खो, कबड्डी, लंगडी,अशा विविध खेळांचे आयोजन केले असल्याचे सहशिक्षक शीतल मस्के यांनी सांगितले.