जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर, ( पंढरी नगरी न्यूज ) सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी मंदीर समितीचे तहसिलदार सुशिल बेल्हेकर, नगरपालिका प्रशासन अधिकारी अधिकारी अशिष लोकरे, मुख्याधिकारी अरविंद माळी, उपस्थित होते.