विजया कोळी यांना सर फाउंडेशन स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशनचा जिल्हास्तरीय नारीशक्ती सन्मान पुरस्कार प्रदान..
-----------------------------------------------------------------------------------
सिद्धेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील शिक्षकांचा कोळी यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव
-----------------------------------------------------------------------------------
सोलापूर( दै.पंढरी नगरी न्यूज) स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन अर्थात सर फाउंडेशन महाराष्ट्र व महाराष्ट्र वुमन टीचर्स फोरमच्या वतीने प्रत्येकवर्षी दिला जाणारा सोलापूर जिल्हा स्तरीय नारीशक्ती सन्मान पुरस्कार प्राथमिक शिक्षिका विजया कोळी यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. सन - २०२२-२३ साठी विजया कोळी यांची पुरस्काराची निवड करण्यात आली होती. हा पुरस्कार सोलापूर येथील वि. गु शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जुळे सोलापूर येथील सभागृहात सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या शुभहस्ते शनिवार दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ३ वाजता सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शितल उगले,सोलापूर वैद्यकीय महविद्यालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अग्रजा चिटणीस दै.सकाळचे निवासी संपादक अभय दिवाणजी, तसेच स्वामी समर्थ सूतगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
पुरस्कार प्राप्त विजया कोळी यांनी शिक्षिका म्हणून काम करीत असताना आज पर्यंत शाळा स्तरावर अनेक नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून अध्यापन सामाजिक कार्यातील मोलाचा सहभाग घेऊन समाजात अविस्मरणीय अशी मोठी कामगिरी केली होती. सामाजिक व शैक्षणिक कामाची दखल घेऊन महाराष्ट्रात नामांकित म्हणून काम करत असलेल्या असलेल्या सर फाउंडेशन ने विजया कोळी यांना जागतिक महिला दिनानिमित्त सोलापूर जिल्हास्तरीय नारीशक्ती सन्मान हा दिमाकदार उत्साही वातावरणात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शिक्षिका विजया कोळी सध्या जिल्हा परिषद प्रा .केंद्र शाळा सिद्धेवाडी येथे कार्यरत आहेत.
यावेळी पुरस्कार वितरण सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमास सर फाउंडेशनचे राज्य समन्वयक सिताराम माशाळे, बाळासाहेब वाघ, फाउंडेशनच्या महिला राज्य समन्वयक हेमा शिंदे, जिल्हा महिला समन्वयक अनघा जहागीरदार, पंढरपूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष नितीन पाटील गुरुजी , जाधव - नागणे वस्ती शाळेचे मुख्याध्यापक तथा जि .प .केंद्र शाळा सिद्धेवाडी केंद्रप्रमुख एम .बी जाधव गुरुजी ,महादेव सातपुते ,सतिश पाटील , शिरगांव जि. प शाळेचे मुख्याध्यापक डी .डी सावंतराव ,संतोष कुलकर्णी ,मकरंद रणदिवे ,अवधूत गायकवाड ,सुरेश कोळी ,सेवानिवृत्त शिक्षक चंद्रदीपक भालेकर ,पंढरपूर तालुका प्राथमिक शिक्षक पत सोसायटीचे संचालक धनाजी जाधव ,सिद्धेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच रोहिणी सारंग जाधव, सिद्धेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग कोकाटे, शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सोनाली जाधव, सदस्या गीतांजली नवले - वाघमारे, सौ .कोकाटे मँडम, सौ.भालेकर मँडम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजय कोळी यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल पुणे विभागीय शिक्षक मा.आमदार दत्तात्रय सावंत, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत काळे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते बाळासाहेब काळे गुरुजी, राज्याचे शिक्षक संघाचे उपाध्यक्ष व उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक नागनाथ क्षीरसागर ,शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय येडगे,शिक्षक संघाचे तालुकाअध्यक्ष रामभाऊ यादव, शिक्षक संघाचे नेते तात्यासाहेब यादव, ज्योतीराम बोंगे, दादाराजे देशमुख, विष्णुपंत गावडे, शिक्षक नेते का. वि वाघमारे, शांताराम गाजरे यांनी अभिनंदन केले.