*शिवरत्न ज्युनिअर कॉलेज गादेगाव मधील विद्यार्थ्यांचे एमएच-सीईटी परीक्षेमध्ये घवघवीत यश*

*शिवरत्न ज्युनिअर कॉलेज गादेगाव मधील विद्यार्थ्यांचे एमएच-सीईटी परीक्षेमध्ये घवघवीत यश*

*पंढरपूर,(प्रतिनिधी):-*
गादेगाव येथील शिवरत्न ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून तालुक्यामध्ये अव्वल स्थानी ठरले आहेत.शिवरत्न ज्युनिअर कॉलेजमधील १)आदित्य धुमाळ या विद्यार्थ्याने 99.91% २) राज सावंत यांना 99.80% ३) दुर्वांकुर अनुभुले 99.18% ४) दिया गोयल 98.99% ५) अक्षत फडे 98.40%  या विद्यार्थ्यांनी गुण मिळवून तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. सीईटी परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवून तालुक्यामध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे .गेल्या वर्षीही सीईटी मध्ये शिवरत्न ज्युनिअर कॉलेजची प्रणाली पाटील तालुक्यामध्ये अव्वल राहिली  होती .तीच परंपरा पुढे शिवरत्न ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राखून ठेवले आहे. काही दिवसापूर्वी लागलेल्या नीट परीक्षेच्या निकालामध्ये शिवरत्न ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून आपला एमबीबीएस मधील प्रवेश निश्चित  केला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष उपसरपंच गणपत मोरे यांनी अभिनंदन केले त्याचबरोबर सहशिक्षक राजेंद्र मोलाने, दीपक देशमुख, नियाज मुलानी, दस्तगीर शेख ,नागेश कांबळे ,सोमनाथ भुईटे ,शितल मस्के ,लीना बागल, शीतल बागल, प्राजक्ता मस्के ,कौस्तुभ सांगोलकर ,अजय मोरे आदींनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.