*लंपी आजारापासून शेतकऱ्यांनी सतर्क रहावे- पशुधन विकास विस्तार अधिकारी श्रीमती प्रियंका जाधव यांचे आव्हान:*

*लंपी  आजारापासून शेतकऱ्यांनी सतर्क रहावे- पशुधन विकास विस्तार अधिकारी श्रीमती प्रियंका जाधव यांचे आव्हान:*

पंढरपूर (प्रतिनिधी) लंपी स्कीन चर्मरोग सारख्या संसर्गजन्य आजारापासून पशुधन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी सतर्क रहावे. असे आवाहन पंढरपूर पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी श्रीमती प्रियंका जाधव यांनी केले. पंचायत समिती येथील शेतकरी निवास कार्यालयात या रोगाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. तालुक्यातील शेतकऱ्यांनी लंपी सारख्या आजार पशुंना होताच ताकाळ नजीकच्या सरकारी वैद्यकीय दवाखान्याची संपर्क साधावा. पशु व्यवसायिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसले तरी सतर्क राहणे गरजेचे असून राज्य शासनाने प्रतिबंधात्मक उपाय योजले आहेत. पण राज्यातून येणारी बाधित जाणारे अथवा त्यांच्यासाठी वापरात आणलेले खाद्य साहित्य वैरण अथवा आणि भाऊ यांचा देखील प्रादुराव जाणारा होऊ नये याची दक्षता घेण्यात यावी पशुपालकांनी जनावरे बाजार स्पर्धा प्रदर्शन अथवा गट अशी एकापेक्षा अनेक जनावरे एकत्र येणारी ठिकाणे शासनाच्या पुढील आदेशापर्यंत टाळावेत जनावरांची दैनंदिनी काळजी घेत गरजेनुसार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. असे आवाहन पशुविकास विस्तार अधिकारी श्रीमती प्रियंका जाधव यांनी केले.

याबाबत अधिक माहिती बाबत त्या म्हणाल्या की राज्य सरकारकडून लंपि रोगाला हद्दपार करण्यासाठी पुढील आठवड्यात  एक लाख लस उपलब्ध करून ती मोफत देण्यात असल्याचे सांगितले त्यासाठी शेतकऱ्यांचे पशुधन वाचवण्यासाठी आमचे विभाग कडून 24 तास सेवा सहकार्य आमचे कर्मचारी उपलब्ध ठेवण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याबरोबर लंपी  हद्दपार करण्यासाठी शिबिर देखील पशुसंवर्धन विभागाच्या वतीने घेण्यात येतील या बैठकीला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे नायब महसूल तहसीलदार पंडित कोळी तसेच विविध खात्याची अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.