इतिहास संशोधक डॉ. प्रा. मधुकर जाधव यांना राज्य स्तरीय साहित्य पुरस्काराने सन्मानित... अहमदनगर जिल्ह्यात स्वतःच्या कौशल्याचा डंका

इतिहास संशोधक डॉ. प्रा. मधुकर जाधव यांना राज्य स्तरीय साहित्य पुरस्काराने सन्मानित... अहमदनगर जिल्ह्यात स्वतःच्या कौशल्याचा डंका

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर(  पंढरी नगरी न्यूज ) सिध्देवाडी ता. पंढरपूर गावचे सुपुत्र व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी ता. चंदगड येथील नामवंत इतिहास  संशोधक सहयोगी प्राध्यापक डॉ. मधुकर विठ्ठल जाधव यांना छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य स्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला .

पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, महा वस्त्र ,ग्रंथगुच्छ,व रोख रक्कम रुपये दहा हजार असा आहे. यासाठी १३० साहित्याची तपासणी करून त्यांच्या सरसेनापती प्रतापराव गुजर या साहित्य कृतीला अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचा विशेष  पुरस्कार देण्यात आला. त्यांना मराठ्यांची शस्त्रास्त्रे एक चिकित्सक अभ्यास या विषयासाठी शिवाजी विद्यापीठाचा संशोधन प्रकल्प मंजूर झाला आहे. त्या साठी त्यांना १ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे .

डॉ. मधुकर जाधव यांनी शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास मंडळावर तसेच इतिहास परिषदेवर काम केले आहे. सध्या ते संजय घोडावत विद्यापिठाच्या अभ्यास मंडळावर व सातारा इतिहास परिषदेवर कार्यरत आहेत . त्यांची दोन पुस्तके व १४० शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत . त्यांनी युजीसी चा  एक प्रकल्प पूर्ण केला आहे . इतिहासावर त्यांनी आजपर्यंत ९५० व्याख्याने दिली आहेत. त्याना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत . त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे. हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेक राजकीय सामाजिक कला व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ.प्रा. मधुकर जाधव यांचे फोनद्वारे शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.