ढवळस जि.प.प्रा .शाळेचे शिक्षक धनंजय लेंडवे यांचा निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न...
------------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (पंढरी नगरी न्यूज ) मंगळवेढा तालुक्यातील ढवळस जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री.धनंजय अशोक लेंडवे हे दि.१६/९/२०११ ते १६/५/२०२३ या कालावधीत सुमारे १२ वर्षामध्ये त्यांनी शाळेत ज्ञानदानाचे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम केले आहे.त्यांच्या या १२ वर्षाच्या कालावधीत त्यांनी शाळा ISO नामांकन करण्यात आली.
शाळेतील इ.२ री पासून विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षासाठी बसवून विद्यार्थ्यांना गुणवत्ता संपन्न केले. २०१८ साली शाळेतील विद्यार्थ्यांनी टॅलेंट हंट स्पेर्धेत ५ स्पर्धा प्रकारात जिल्ह्यात क्रमांक मिळविला. क्रिडास्पर्धेत दरवर्षी कबड्डी,लंगडी यामध्ये तालुका प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा स्पर्धेपर्यत धडक असायची.
ढवळस शाळेत स्वच्छ सुंदर शाळा उपक्रम राबविला त्यामध्ये लोकसहभागातून शाळा रंग रंगोटी कामासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेसाठी सुमारे २ लाख रुपये देणगी मिळविली.शाळा खोली दुरूस्तीसाठी कमीत-कमी मजुरीमध्ये कोरोना कालावधीत सुरेख काम करून ६ वर्गखोल्या दुरुस्त केल्या.
माझी शाळा माझा अभिमान या उक्तीप्रमाणे काम केल्यामुळे शाळेच्या व गावाच्या वैभवाच्या दृष्टीने शाळेचे महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदर्श शाळा म्हणून मंगळवेढा तालुक्यामध्ये एकवेम ढवळस शाळेची निवड करण्यात आली आहे. विविध उपक्रम राबवून विद्यार्थी गुणवत्ता संपन्न व विविध आदर्श पैलू विद्यार्थ्यांना देण्याचे पवित्र कार्य शिक्षक धनंजय लेंडवे यांनी केले.
गुणवत्ते बरोबर त्यांनी आदर्शवत वर्तनशील असणारे अनेक विद्यार्थी १२ वर्षात घडविले. मोठ्या शाळेत त्यांनी फक्त माझा- माझा वर्ग न पाहता माझी शाळा आगोदर व नंतर या शाळेतला माझा वर्ग याप्रमाणे शिस्तप्रिय विद्यार्थी घडविले.त्यांच्या बदलीमुळे विद्यार्थी तर धायमुख होऊन रडत होतेच तर मुख्या.सुर्यकांत जाधव,अध्यक्ष पंपूशेठ मोरे व बरेच माजी विद्यार्थी भावूक झाले होते.
अशा या आदर्श शाळेतील आदर्श शिक्षकांचा निरोप समारंभ कार्यक्रमानिमित्त गावचे सरपंच मा.सौ.रोहिणी हेंबाडे, घरनिकी केंद्रप्रमुख पुरुषोत्तम राठोड ,विस्तार अधिकारी मल्लिकार्जुन आनंदपुरे, माजी सरपंच डॉ. सिध्देश्वर मोरे, माजी सरपंच आबासाहेब मोरे,युवक नेते विश्वनाथ हेंबाडे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष पंपूशेठ मोरे,गिरजाप्पा मस्के,मंगेश मोरे,आबासाहेब गायकवाड,अमोल मोरे,अमर मोरे,बालाजी मोरे,मधुकर हेंबाडे, दादासो मोरे,आदेश बावचे,शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत जाधव, सहशिक्षक विजय गायकवाड,सुदर्शन शेजाळ,संभाजी सुळकुंडे,मोहन लेंडवे, शिक्षिका राजश्री माळी, मनिषा जगताप आदी यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला.