वसंतराव काळे प्रशालेची विद्यार्थिनी प्रीती काळे हिचा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते सत्कार..
________________________________________________
वाडीकुरोली प्रतिनिधी : श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळ वाडीकुरोली संचलित वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्रीती अशोक काळे हिने खेलो इंडिया राष्ट्रीय खो खो स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले बद्दल रविवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२२ रोजी बारामती येथील विद्या प्रतिष्ठान संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे नेते बाळासाहेब काळे गुरुजी उपस्थित होते.
यावेळी पुढील वाटचालीसाठी विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांनी प्रीती काळे हिला पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.