पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी हनुमंतराव मोरे , शहर काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षपदी अमर सूर्यवंशी

पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी हनुमंतराव मोरे , शहर काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षपदी अमर सूर्यवंशी

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर;(दै.पंढरी-नगरी न्यूज) : पंढरपूर शहर कॉंग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षपदी अमर वसंत सुर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे.निवडीनंतर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. अमर सुर्यवंशी यांनी यापूर्वी एन.एस.यु.आय., युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष, फादर बॉडी शहर उपाध्यक्ष, जिल्हा चिटणीस, जिल्हा सचिव या पदावर काम केलेले आहे.

कॉंग्रेस पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार असून कॉंग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष अँड. मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, आ. प्रणिती शिंदे, जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, माजी तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील(तुंगत) महिला नेत्या सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेस पक्षाची फळी मजबूत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सुर्यवंशी यांनी सांगितले. यावेळी किशोर महाराज जाधव, हणमंत मोरे, अक्षय शेळके, शंकर सुरवसे, संदिप शिंदे, बाळासाहेब आसबे, शिवाजी धोत्रे, दयानंद आटकळे यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.