प्राथमिक शिक्षक संघ शिवाजीराव पाटीलगट शिक्षक संघाची सोलापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर

प्राथमिक शिक्षक संघ शिवाजीराव पाटीलगट शिक्षक संघाची सोलापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर

---------------------------------------------------------------------------------

सोलापूर( पंढरी नगरी न्यूज ) महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या शिक्षक नेते माजी आमदार शिवाजीराव पाटील गटाची सोलापूर जिल्हा कार्यकारिणी चे बैठक नुकतीच संपन्न झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सल्लागार बाळासाहेब काळे गुरुजी यांनी दिली .यावेळी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी बाळकृष्ण मैत्री यांची निवड करण्यात आली त्याचबरोबर सरचिटणीसपदी पंढरपूरचे शिक्षकचे नेते राम यादव यांची तर कार्यालयीन सचिव पदी सतीश वाले यांची निवड करण्यात आल्याची माहिती सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष वीरभद्र यादवाड यांनी जाहीर केले यावेळी बैठकीस प्राथमिक शिक्षक संघाचे माजी जिल्हाध्यक्ष शिवानंद भरले, उतम जमदाडे, शिक्षक नेते दादाराजे देशमुख, रावसाहेब जाधवर, संभाजीराव फुले, विठ्ठलराव काळे, आबासाहेब जाधवर इत्यादी प्रमुख शिक्षक नेते बैठकीस उपस्थित होते.

यावेळी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेत  फेर बदल करण्यात आले असून नवीन कार्यक्षम शिक्षक नेत्यांना संधी देण्यात आली.  त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक संघटनेतील कार्यकर्त्यांमध्ये शिक्षक संघटना वाढीसाठी उत्साहाचे वातावरण निर्माण झाली आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सल्लागार बाळासाहेब काळे गुरुजी यांनी शिक्षक संघटना वाढीसाठी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी शेखर कोरके, भगवानराव चौगुले, शिवाजीराव पाटील, आबासाहेब जाधवर, राजकुमार बिजरगी, सिदाम कटगेरी, रमेश शिंदे, बालाजी गुरव, सुरेश शटगार, बा. दा. मुल्ला, पाटील इत्यादी उपस्थित होते.