कासेगाव येथील दौलतराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा..
-----------------------------------------------------------------------------------
कासेगांव( दै.पंढरी नगरी न्यूज) : कासेगांव (ता .पंढरपूर )येथील दौलतराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कासेगाव. आज प्रशालेमध्ये आपल्या देशाचा ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
ध्वजारोहण दिआटपाडी एज्युकेशन सोसायटी आटपाडीचे सन्माननीय संचालक व कासेगांव जिल्हा परिषद सदस्य वसंतराव दौलतराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन ही करण्यात आली होते.
याप्रसंगी कासेगाव चे सरपंच श्री .सिद्धेश्वर भुसे उपसरपंच संग्रामभैया देशमुख तसेच ग्रामपंचायत सदस्य , पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशालेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री. लवटे सर , पर्यवेक्षक श्री. फडतरे सर व सर्व शिक्षक -शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले व कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.