पंढरपूर सरगम चौक खूणावतोय अपघाताला निमंत्रण..
------------------------------------------------------------------------------------
वाहतूक पोलीसांचे "लक्ष" वाहतूक कोंडी सुरळीत करण्यापेक्षा एकच लक्ष वसुलीवर "दक्ष"
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) : पंढरपूर शहर हे आध्यात्मिक नगरी म्हणून ओळखले जाते. विठ्ठल- रूक्मिणी मंदीर असल्याने या ठिकाणी कायमस्वरूपी भाविकांची गर्दी असते. त्यामुळे पंढरपूर शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच शहरातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सरगम चौकात तर कायमच वाहतूक कोंडी होत आहे. टेंभुर्णी मार्गे येणारी सर्व अवजड वाहने बायपास मार्गाने न जाता सरगम चौकातून पुढे जात असल्याने कायमच नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कर्मयोगी काॅलेज चौक ते सरगम चौक रोडवरती मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून वाहण धारकांना वाहण चालवणे अडचणीचे ठरत आहे. मात्र शहर वाहतूक शाखेचे पोलिस मात्र प्रत्येक चौकात उभे राहून ग्रामीण भागातील नागरिकांना टार्गेट करून वसूली करण्यातच धन्यता मानत आहेत.पोलीसांनी वसूलीची पुर्णपणे हद्दच पार केली असल्याने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
आज पंढरपूर येथील सरगम चौक मध्ये अकलूज पंढरपूर बस क्रमांक एम एच १४ बीटी १९९० ही बस पंढरपूर येथे बस अकलूज होऊन पंढरपूर बस स्थानकाकडे जात असताना पंढरपूर बस स्थानकापासून २०० मीटर अलीकडे असलेल्या सरगम चौक येथे एक महिला पायी चालत जात असताना बसच्या समोरील चाकाखाली सापडून अपघात घडला यावेळी अशी माहिती की भोसले चौक परिसरातील जयाबाई थिटे ही महिला पंचरत्न शाळेमध्ये शिपाई या कामावर कार्यरत असून आपल्या नेहमीच्या वेळी शाळेतील कामकाज उरकून घरी जात असताना हा अपघात घडला हा अपघात एवढा भीषण होता की महिलेच्या डोक्यावरून पुढील जात गेले असता महिलेचा जागी मृत्यू झाला अपघाताची खबर मिळताच पंढरपूर वाहतूक पोलीस त्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यात आली प्राथमिक माहितीनुसार बसच्या चालकाचा पुढे खड्डा असल्यामुळे खड्डा वाचवण्याच्या नादात हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शी सांगण्यात आले आहेत.