मातोश्री ईश्वराम्मा विद्यालयाची विद्यार्थी सायली अष्टेकर राजभाषा हिंदी परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण..

मातोश्री ईश्वराम्मा विद्यालयाची विद्यार्थी सायली अष्टेकर राजभाषा हिंदी परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण..

---------------------------------------------------------------------------------
रुक्मिणी विद्यापीठ या संस्थेकडून शुभेच्छा चा वर्षाव व कौतुक..
---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै. पंढरी नगरी न्यूज.) : महात्मा  गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था पुणे यांचे वतीने घेण्यात आलेल्या अखिल भारतीय राजभाषा हिंदी परीक्षेमध्ये पंढरपूर येथील श्री रुक्मिणी विद्यापीठ संचलित मातोश्री ईश्वराम्मा विद्यालयाची सायली युवराज आष्टेकर हि विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण  झाल्याने तिचा संस्था सचिवा सुनेत्राताई पवार यांचे शुभहस्ते गोल्ड मेडल, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन  गौरविण्यात आले.

या परीक्षेत प्रशालेतील एकुण ७२ विद्यार्थ्यांपैकी पुढील श्रेयश घाडगे, आर्यन वसेकर, कल्याणी घाडगे, संध्या घाडगे, साईराज राऊत, संकेत नवले ,सोहम भंडारे ,सुनीता देवकते, कार्तिकी पाटील ,भक्ती जुमाळे, निकिता कदम, अर्जुन सय्यद, वैभवी क्षीरसागर, प्रणाली सावंत, धनश्री कांबळे, भक्ती कवडे, मुक्ता जुमाळे, साक्षी थोरात, माधवी कांबळे, अलिषा शेख, दरकासा सय्यद, तौकीर काझी, मुनीर तांबोळी, पद्मिनी ठाकूर, प्रणव साळुंखे या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल, प्रशस्तीपत्र शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा लिगाडे यांचे शुभ हस्ते देऊन गौरविण्यात आले. तर प्रशालेतील हिंदीच्या उत्कृष्ट शिक्षिका फरहाणा कादरी व मुख्याध्यापिका नंदिनी गायकवाड यांनाही विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय सहभाग नोंदविल्याबद्दल मान्यवरांचे शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी संस्था सचिवा सौ. सुनेत्राताई पवार म्हणाले की मुलांना बाह्य परीक्षांचे विशेष ज्ञान प्राप्त होण्याच्या दृष्टीने प्रशाला राबवीत असलेल्या उपक्रमाबद्दल कौतुक करून गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रशाला कटिबद्ध असल्याचे सांगितले.शिक्षक व विद्यार्थ्यांनी अध्ययनासाठी उपयुक्त अशी साहित्य निर्मिती करून शिक्षणात याचा उपयोग करून मुलांनी जिवनात सकारात्मक राहून बौद्धिक कौशल्यात वाढ करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे आशा लोंढे, साक्षी लिगाडे, सतीश शिंदे ,मच्छिंद्र गाडे, आकांक्षा कांबळे ,शहिदास सय्यद अजित थोरात यांचे सह पालक वर्ग व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विभावरी डुबल यांनी केले तर आभार सविता लोखंडे यांनी माणले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माधुरी बोडके, फरहाणा कादरी , कुमुदिनी सरदार यांनी विशेष परिश्रम घेतले.