जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढवा - प्राचार्य जे. जी. जाधव

जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढवा - प्राचार्य जे. जी. जाधव

------------------------------------------------------------------------------------
सिध्दवाडी येथे स्वच्छतादूत शिबीराचा उत्साहात शुभारंभ
------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) : राष्ट्रीय सेवा योजना शिबीरातून युवकांचा व्यक्तीमत्व विकास होतो. स्वच्छतादीत शिबीरामुळे गावात जनजागृती होणेस मदत होते. मुलगी मुला समान आहे. मुलींचा जन्मदर वाढवा असे आवाहन रयत संरक्षण संस्थेचे माजी सचिव व प्राचार्य जे .जी. जाधव यांनी केले.

पंढरपूर तालुक्यांतील सिध्देवाडी येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर यांचे वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे उदघाटन प्राचार्य जे. जी जाधव यांचे हस्ते करण्यात आले. या समारंभास प्रमुख पाहुणे  म्हणून उप मुख्य कार्यकारी अधिकारी  जावेद शेख उपस्थित होते. या समारंभाचे अध्यक्षस्थानी  कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. सी जे   खिलारे हे होते.

यावेळी उप प्राचार्य चांगदेव कांबळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सरपंच रोहिणी सारंग जाधव, विठ्ठल चे संचालक दशरथ जाधव, रयत शिक्षण संस्थेतले मॅनिजिंग काॅनेसिल चे सदस्य डाॅ. राजेंद्र जाधव,  रासेयो शिबीराचे कार्यक्रम अधिकारी , विठ्टल चे माजी संचालक गोकुळ जाधव, माजी सैनिक बाबुराव गोडसे, प्रगतीशील बागायतदार बालाजी जाधव, बजरंग जाधव, सोमलिंग देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष साहेबराव जाधव, जि.प .प्राथमिक केंद्र शाळा जाधव- नागणे वस्ती मुख्याध्यापक  एम .बी .जाधव, जय भवानी मजूर सहकारी सोसायटीचे चेअरमन सारंग जाधव, जि. प .प्राथमीक शाळा सिद्धेवाडी मुख्याध्यापक पांडूरंग कोकाटे, प्रमुख उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना प्राचार्य जे .जी. जाधव म्हणाले, सिध्देवाडी हे गाव खुप चांगले आहे. लोकांशी आपण कशा प्रकारे संवाद साधतो त्यांवर अवलंबून आहे. मुलींनी श्रमास महत्व द्यावे. जे श्रमाला महत्व देतील ते पुढे जातील. असेही प्राचार्य जाधव यांनी सांगितले. प्रास्तविक कार्यक्रम अधिकारी डाॅ. दत्तात्रय चौधरी यांनी केले. यावेळीडाॅ. बजरंग शितोळे, प्रा . सुमन केंद्रे, डाॅ. फेमिदा विजापुरे, प्रा. धनंजय कदम, प्रा. सागर शिवशरण, प्रा. परमेश्वर दुधाळ, प्रा. डाॅ. भारत सुळे, प्रा. डाॅ. बालाजी लोंढे उपस्थित होते.

मुलींना जीवदान द्या - जावेद शेख ; मुलींचे जिल्ह्यातील घटते प्रमाण हे चिंताजनक आहे. सोलापूर जिल्हयात एक हजार मुलांमध्ये ४९ मुले बिगर लग्नाची राहतील. कारण एक हजार मुलांना एक हजार मुली असणे आवश्यक आहे हे प्रमाण दर हजारी ९४१ आहे. महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख यांनी बोलताना व्यक्त केले.

खेड्याकडे चला - प्राचार्य डाॅ. खिलार ; महात्मा गांधीजींनी खेड्याकडे चला असा नारा दिला. कोरोना मध्ये लोक खेड्याकडे आले. गावाचे व श्रमाचे महत्व समजून घ्या असेही प्राचार्य डाॅ. खिलारे यांनी आपले अध्यक्षपदावरून बोलताना सांगितले. सिध्देवाडी येथील शिबीर यशस्वी करा. १४ वर्षानंतर या गावात शिबीर होत आहे. संस्थेचे माजी सचिव जे .जी. जाधव यांची जन्मभूमी आहे. कर्मभुमी रयत शिक्षण संस्था आहे. असेही त्यांनी सांगितले. सर्पतज्ञ उध्दव जाधव यांचा सत्कार करणेत आला.आदर्श ग्रामसेवक शहाजी शेणवे यांनी आभार मानले.