पंढरपुरात अनोख्या पद्धतीने लग्न सोहळ्यात साडेतीन हजार केशर आंब्याच्या रोपांचे वाटप...

पंढरपुरात अनोख्या पद्धतीने लग्न सोहळ्यात साडेतीन हजार केशर आंब्याच्या रोपांचे वाटप...

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) : पंढरपुरात माळशिरस येथे एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे. सगळ्या विवाह सोहळ्यात हार , फेटे दिले जातात, मात्र माळशिरस येथे एका विवाह सोहळ्यामध्ये अक्षदांबरोबरच आलेल्या पाहुण्यांना केशर आंब्यांची रोपे भेट देण्यात आले आहे.

विवाह सोहळ्याच्या निमित्ताने सुमारे साडेतीन‌ हजार रोपांचे वाटप करून मुलीच्या वडीलांने पर्यावरणाचा संदेश दिला‌ आहे. मच्छिंद्र ‌ठवरे यांनी‌ राबवलेल्या या सामाजिक उपक्रमाची पंढरपूर व माळशिरस परिसरात सर्वत्र चर्चा सुरू आहे.