भालेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात संविधान दिनाचे उत्साहाने वाचन
------------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (पंढरी नगरी न्युज) मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायत भालेवाडी येथे संविधान दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला . डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधान उद्देशिकाचे सामूहिक वाचन ग्रामपंचायत कार्यालयातील करण्यात आले. तसेच 26/11 रोजी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

सदर कार्यक्रम साठी भालेवाडी गावाचे लोकनियुक्त सरपंच डॉ.श्री. श्रीकांत दवले,उपसरपंच श्री. लिंगेश्वर गवळी, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत गवळी, गणेश गवळी, मा. सरपंच अर्जुन शिवशरण , ग्रामसेवक गायकवाड , दिलीप शिवशरण , विशाल कांबळे , बाजीराव गवळी, कोकरे गुरुजी , सुनील गवळी , भागवत गवळी व मा.सरपंच महादेव दवले इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
