नवयुग गणेशोत्सव तरुण मंडळातर्फे विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

नवयुग गणेशोत्सव तरुण मंडळातर्फे विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

******************************************************

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर शहर उपनगर इसबावी येथील वैष्णव नगर नवयुग गणेशोत्सव तरुण मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही विविध सामाजिक उपक्रम कार्यक्रमांचे आयोजन केले आहे .

यामध्ये सोमवार दि २५ रोजी स १० ते ३ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर व आयुष्यमान भारत कार्ड काढून देणे मंगळवार रोजी स १० ते ४ वाजेपर्यंत आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे सांय ४ ते ५ निबंध स्पर्धा सांय ५ ते ६ चिञकला स्पर्धा सांय ७ ते ८ वाजेपर्यंत पोती उडी ही स्पर्धा होईल तर बुधवार रोजी स १० ते ४ पर्यंत मतदान कार्ड मधील दुरुस्ती करणे नाव पत्ता फोटो अपडेट करणे नवीन नाव नोंदणी करणे तसेच सांय ५ ते ६ रांगोळी स्पर्धा ६ ते ७ लिंबू चमचा ७ ते ८ संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन नवयुग गणेशोत्सव तरुण मंडळ वैष्णव नगर इसबावी-पंढरपूर येथे करण्यात आले असून वरील सर्व सदर स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभ दि २८ गुरूवार रोजी सांय ६ वा करण्यात येणार असल्याची माहिती शशिकांत म्हेञे यांनी दिली.