शेतकऱ्यांना आठ तास वीज द्या अन्यथा उग्र आंदोलन करू- सचिन आटकळे .. भंटुबरेत स्वाभिमानी चा रास्ता रोको
--------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( पंढरी नगरी न्यूज ) भटुबरे ता.पंढरपूर गुरसाळे रोडवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गुरसाळे व पंढरपूर बंधार् यावरील सुमारे 7 गावाना 8 तास लाईट द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन आटकळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले.
उजनी धरणातून सोलापूर व भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांना पाणी सोडण्यात आले होते पाणी सोलापूर ला पोहचून आठवडा झाला तरीही गुरसाळे व पंढरपूर बंधाऱ्यावर आसलेल्या नदी काठच्या गावाचा वीज पुरवठा खंडित करून फक्त दोन तास सुरु ठेवला आहे त्यामुळे जनावरांच्या पिण्याचा आणि शेतीचा विषय अतिशय बिकट झाला असून शेतकरी वर्गात प्रचंड संतापाची लाट तयार झाली असून शेतकरी संकटात सापडला आहे.
नदी काठच्या 10-12 गावातील पिण्याच्या,जनावराच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असुन आता तोंडाशी आलेली शेतकऱ्याची पिके असतानाही पाण्यावाचून करपू लागली आहेत उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे त्यामुळे जनावरांना पिण्यासाठी व शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते परंतु वीज पुरवठा खंडित केल्यामुळे या सगळ्या गोष्टी अडचणीच्या करत आहेत कर्नाटकच्या शेतकऱ्यांना सरकार चोवीस तास वीज पुरवठा करतो त्यामुळे आज बंधाऱ्यातून आरक्षित असताना सुद्धा ते शेतकरी 24 तास पाणी उपसा करत आहेत परंतु आपल्या पंढरपूर मधील शेतकऱ्यांना मात्र प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून वीज पुरवठा खंडित करून वेठीस धरले जात आहे शेतकऱ्यांना वीज पुरवठा द्यायचा नसेल तर तसे शासनाने जाहीर करावे व शेतातल्या सर्व पिकाची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून मग खुशाल लाईट बंद ठेवावी आमची काही हरकत नाही
या बंधार्यावर गुरसाळे, शिरढोण, चिंचोली भोसे, भंटुबरे इसबावी, व्होळे, या गावाचा समावेश असून या गावातील शेतकर्याची पिके धोक्यात आली असून महावितरण आली असून भीमा नदीला पाणी असून धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था निर्माण झाली आहे.
या भागातील शेतकर् याच्या पिकाचा आणि जनाराच्या चाकाचा प्रश्न निर्माण झाला असून या भागातील शेतकर्याचा विद्युत पुरवठा 8 तास करावा अन्यथा यापेक्षा ही उग्र आदोलन करणार असल्याचे स्वाभिमानी चे सचिन आटकळे यांनी सांगितले आहे. या आदोलना दरम्यान वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती शेतकरी मोठ्या प्रमाणात होते पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन कडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आदोलनाला स्वाभिमानी चे शहाजहान शेख, पार्थ सुरवसे, दिपक शिंदे, शंकर गोडसे, विठ्ठल पाटील,मोहन दादा सुधाकर कवडे,सागर गोडसे, शिवाजी पवार, परमेश्वर पवार, नाना गाढवे, रामचंद्र कारंडे, रमेश पवार, तानाजी धुमाळ, शिवाजी नागटिळक,सुदाम पवार, सुहास पवार, पंकज कन्हेकर ,सागर पवार,आदि शेतकरी उपस्थित होते.