*गादेगावात विविध पक्षाच्या व संस्थांच्या निवडी जाहीर:*
----------------------------------------------------------------------------
*गादेगाव,(प्रतिनिधी):-* येथील अविनाश बागल यांची पंढरपूर विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमन पदी निवड करण्यात आली. तसेच न्यू इंग्लिश स्कूल गुरुकुल पालक शिक्षक संघाच्या सचिव पदी डॉक्टर रमेश पाटील यांची निवड करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग पंढरपूरच्या उपाध्यक्षपदी संजय बागल तर तालुका सरचिटणीस पदी विनोद बागल यांची निवड झाल्याने या सर्व प्रमुख मान्यवर मंडळींचा सत्कार गावातील छत्रपती प्रतिष्ठान गादेगाव व एन पी कंट्रक्शन कंपनी पंढरपूर यांच्या वतीने सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सिताराम बापू बागल, बाजीराव बागल, सतीश बागल, शांतीनाथ प्रभाकर बागल, प्रताप बागल, सौदागर गिड्डे, नवनाथ बागल, शशिकांत माने, शिवाजी बागल, पिंटू काळे, विशाल बागल, बंडू हजारे, शशिकांत बागल नवनाथ शिंदे, अक्षय मोरे, इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होती.