पंढरपूर नगरपालिका हद्दीतील स्मशानभूमीची मनसेच्या वतीने केली दुरुस्ती..
-----------------------------------------------------------------------------------
पंढरपूर; (दै.पंढरी नगरी न्यूज ) : नगरपालिकेच्या ढिसाळ कारभार व दुर्लक्षेमुळे पंढरपूर शहरातील हिंदू स्मशानभूमीची अवस्था दुरावस्था झाली होती त्यामुळे येणाऱ्या नागरिकांना तेथील मशानभूमीची दुरावस्था पाहून नगरपालिके विषयी नाराजीची चर्चा होत होती ही बाब पंढरपुरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने मनसेच्या वतीने तीन नंबर कट्ट्याचे काम मनसेच्या वतीने आज सुरू करण्यात आले. प्रत्येक कट्टा दुरुस्त करून वापरात येण्यासाठी सहा दिवस लागत असून यापूर्वी दोन कट्टे तयार करण्यात आले असून मनसेच्या वतीने मशानभूमीमध्ये दुरुस्तीचे काम केल्यामुळे या कामाचे सबंध पंढरपूर शहरवासीयाकडून कौतुक होत आहे.
यावेळी माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर ,नगरसेवक प्रताप गंगेकर, मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत आप्पा पाटील, मनसे उप शहराध्यक्ष गणेश पिंपळनेरकर, पैलवान विजय थोरात, नगर नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर, समाजसेवक माऊली गांडुळे, शहाजी शिंदे इत्यादी उपस्थित होते. स्मशानभूमी दुरुस्तीचा संपूर्ण खर्च मनसेचे पदाधिकारी करीत आहेत.