पीएम श्री. जवाहर नवोदय विद्यालयात प्रकाश पर्व साजरे
__________________________________________________
तुळजापूर (पंढरी नगरी न्यूज ) पीएम श्री .जवाहर नवोदय विद्यालय शीख धर्माचे संस्थापक, पहिले गुरू श्री .गुरुनानकजी यांची जयंती सोमवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ प्रकाश पर्व म्हणून साजरी करण्यात आली. या निमित्ताने विद्यालयाचे उप प्राचार्य श्री .एस एच गायकवाड यांच्या करकमलाद्वारे गुरुनानकजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावरती श्री .एच जी जाधव ,के सी चौधरी, व हुडा मॅडम उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कु. प्रतीक्षा जाधव व प्राची सुरवसे या मुलींनी गुरुनानक यांच्या कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. समाजशास्त्राचे विषय अध्यापक श्री के सी चौधरी यांनी गुरुनानकजी यांच्या जीवनातील बालपणचे काही प्रसंग सांगून गुरुनानकजी धर्म सुधारक, समाज सुधारक, देशभक्त कसे होते .याविषयी आपले विचार व्यक्त केले.

शेवटी विद्यालयाचे उप प्राचार्य श्री एस एच गायकवाड विद्यार्थ्यांना मार्गदर्शन म्हणाले की शीख धर्म सर्व जगात सर्वश्रेष्ठ धर्म आहे हे सांगून या धर्मामध्ये सेवाभाव व दातृत्व हा गुण अतिशय महत्त्वाचा आहे. तर हा सेवाभाव गुण घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री हरी जाधव यांनी केले.