पंढरपुरात सोमवार दि.१ रोजी वारकरी सेवा भूषण गौरव पुरस्काराचे जंगी आयोजन

पंढरपुरात सोमवार दि.१ रोजी वारकरी सेवा भूषण गौरव पुरस्काराचे   जंगी आयोजन

-----------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्युज ) शहरातील श्री. गुरु बाबासाहेब आजरेकर महाराज यांचे शिष्य व हनुमंत बाबा (महाराज) यांचे वंशज महाराष्ट्रातील प्रसिद्ध नामवंत कीर्तनकार परमपूज्य पंढरीनाथ (महाराज ) चवरे - आंबेकर -आजरेकर यांच्या वतीने सांप्रदायिक वारकरी सेवा  व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महाराष्ट्रातील संत बांधवांना वारकरी व सामाजिक पुरस्काराने गौरवण्यात येणार असल्याची माहिती प .पू .पंढरीनाथ महाराज चवरे आंबेकर पुरस्कार गौरव उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली. हा गौरव पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम सोमवार दिनांक १ रोजी दुपारी ३ वाजता कार्यक्रमाचे ठिकाण श्री. विठ्ठल - रुक्मिणी मंदिर सभामंडपात होणार आहे.

पुरस्कार वितरण सोलापूर विधान परिषदेचे माजी सदस्य तथा श्री . पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक व निशिगंधा सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक तथा ह. भ. प. गुरुवर्य भागवत (महाराज) चवरे महाराज या मान्यवरांच्या शुभहस्ते वारकरी पुरस्काराचे मानकरी वैजनाथ दादा तिडके यांना तर सामाजिक पुरस्कार पंढरपूर तालुक्यातील चिंचोली- भोसे येथील ग्रामस्थ यांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे  .

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते , वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे हे भूषवणार आहेत तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महामंडलेश्वर देवबाप्पा (महाराज) नाशिक फरशीवाले बाबा ,विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे सोलापूरचे नामवंत विधीतज्ञ उमेश मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सन्मान  सोहळा होणार आहे. कार्यक्रमास  पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट व समस्त राज्यातील नामवंत प्रसिद्ध वारकरी - फडकरी , प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तरी वारकरी संप्रदायातील लहान थोर बंधू भगिनी यांनी होणाऱ्या भरगच्च कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन  ह.भ.प दत्तात्रेय (महाराज ) शिर्के यांनी केले आहे.