पंढरपूर येथील नगर वाचन मंदिर सार्वजनिक वाचनालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी..
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज) : नगर वाचन मंदिर पंढरपूर येथे दिनांक १३ रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . सुरुवातीला प्रतिमा पूजन आपटे उद्योजक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पत्रकार श्री लखन साळुंखे अध्यक्षस्थानी होते. यावेळी संस्थेचे सचिव द .वा वाईकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री पा. म. अल्लापुरकर यांनी केले . यावेळी पा वा उत्पात, शिवाजी बंदपट्टे, बागवान, तसेच अनेक वाचक व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी क्रांतीसुर्य ज्योतिबा महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले.