प्रसिद्ध तुळशी वृंदावन उद्यान ८ जानेवारीपासून खुले करण्यात येणार : वनपरिक्षेत्र अधिकारी- चैताली वाघ

प्रसिद्ध तुळशी वृंदावन उद्यान ८ जानेवारीपासून खुले करण्यात येणार  :  वनपरिक्षेत्र अधिकारी- चैताली वाघ

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर ( पंढरी नगरी न्यूज ) श्री. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. भाविकांसह स्थानिक नागरिक, पर्यटक यमाई तलाव परिसर  येथील तुळशी वृंदावन उद्यान पाहण्यासाठी येतात. तुळशी वृंदावन उद्यान देखभाल व दुरुस्तीचे कामे करण्यासाठी बंद ठेवण्यात आले होते.  तुळशी वृंदावन उद्यानातील कामे पुर्ण झाल्याने दि. ८ जानेवारी २०२४ पासून खुले करण्यात येणार असल्याची माहिती वन परिक्षेत्र चैताली वाघ यांनी दिली आहे.