मंगळवेढा शहर व ग्रामीण हद्दीतील मोटार सायकल चोरांना अटक , 2 लाख रुपये किंमतीच्या 4 मोटार सायकली केल्या हस्तगत, पोलीस निरीक्षक रणजीतसिंह माने यांची धडक कारवाई.

मंगळवेढा शहर व ग्रामीण हद्दीतील मोटार सायकल चोरांना अटक , 2 लाख रुपये किंमतीच्या 4 मोटार सायकली केल्या हस्तगत, पोलीस निरीक्षक रणजीतसिंह माने यांची धडक कारवाई.

---------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा (पंढरी नगरी न्यूज ). 21/02/2023 रोजी सायंकाळी 21/00 वाजता मोजे माचणूर यात्रा पार्किंग मधुन फिर्यादीची मोटार सायकल क्रमांक एम.एच.13 डि.सी. 1716 हि गाडी फिर्यादी दर्शनास मंदीरात गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने चोरुन नेली होती. त्याबाबत मंगळवेढा पोलीस ठाणे गु.र.नं. 228/2023 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

मंगळवेढा पोलीसांनी गोपनीय बातमीदारामार्फत तसेच मोजे माचणूर येथील सीसीटीव्ही फुटेज चेक करून गुन्ह्याचा तपास केला असता दि. 20/04/2023 रोजी चोरीस गेलेली मोटार एक इसम मौजे ब्रम्हपुरी चौकात आल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ मंगळवेढा पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन त्यास मोटार सायकलसह ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव इसराईल मंजुर मुजावर वय 22 वर्षे रा.बेगमपुर ता. मोहोळ असे असल्याचे सांगीतले.

त्यावेळी आम्ही त्यास सदर मोटार सायकल कोणाची आहे. असे विचारले असता तो उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने आम्ही त्यास मंगळवेढा पोलीस ठाणेस घेवुन येवून सदर गुन्ह्यात अटक केली व त्यास  न्यायालयात हजर करुन घेवुन अधिक तपास केला असता त्यांनी अजून दोन गाड्या चोरी केल्याची कबुली दिली.

50,000/-

मंगळवेढा पोलीस ठाणे गु. रनं. 228/2023 मधील चोरीस गेलेली मोटार सायकल तिचा आरटीओ नंबर एम.एच.13 डि.सी. 1716 असा असलेली हिरो कंपनी स्पॅन्डर प्लस आयाक

50,000/-

बीगर नंबरची हिरोहोन्डा कंपनीची सीडी 100 मोटार सायकल तिचा इंजिन नंबर 98E10F04491 असा असलेली चेसीस नंबर ची खाडाखोड केलेली आजुवाकिअ (सदर गाडीचा अभिलेख पडताळुन पाहून पुढील तपास करीत आहोत. ) बीगर नंबरची बजाज कंपनीची सीटी 100 तिचा चेसीस नंबर DUCBLH27314 असा असलेली तिच्या इंजिन नंबरची खाडाखोड केलेली आजुवाकिअं (सदर गाडीचा अभिलेख पडताळुन पाहून पुढील तपास करीत आहोत. )

50,000/-

2) दि. 13/04/2023 रोजी 20/30 वाजता मंगळवेढा शहरातील एसटी स्टॅन्ड आवारातुन फिर्यादी मोटार सायकल क्रमांक एम. एच. 13 बी.एस. 6793 एचएफ डिलक्स कंपनीची मोटार सायकल अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याने मंगळवेढा पोलीस ठाणे गु.र.नं. 313/2023 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

मंगळवेढा पोलीस ठाणेकडील तपास टिम मंगळवेढा शहरात पेट्रोलींग करीत असताना पंढरपुर बायपास रोड या ठिकाणी एक इसम संशयीत रित्या रात्रीच्या वेळी मोटार सायकल रस्त्याच्या बाजूस लावुन बसलेला असताना पोलीसांनी त्याच्याकडे ऐवढ्या रात्री येथे का थांबला आहे. असे म्हणुन त्याचे नाव गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव राहुल प्रविण माने वय 20 वर्षे रा. चिचुबे ता पंढरपुर असे असल्याचे सांगीतले. त्यावेळी पोलीसांनी अधिक चौकशी करुन गाडीच्या कागदपत्राची मागणी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागल्याने त्याला पोलीस ठाणेस आणुन चौकशी केली असताने सदर गाडी एसटी स्टॅन्ड येथुन चोरी केल्याचे सांगीतले. त्याचे वर्णन खालील प्रमाणे-

50,000/-

मंगळवेढा पोलीस ठाणे गु.र.नं. 313/2023 मधील चोरीस गेलेली निळ्या रंगाची एच एफ डिलक्स

कंपनीची मोटार सायकल तिचा आरटीओ नंबर एम.एच.13 बी. एस. 6793 असा असले

2,00,000/-

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, सोलापुर ग्रामीण, अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, मा. श्रीमती राजश्री पाटील मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने मंगळवेढा पोलीस ठाणे सपोनि अंकुश वाघमोडे, पो.हे.कॉ दयानंद हेंबाडे, पोना सुनिल मोरे, पोकॉ अजित मिसाळ, पोकॉ अजय शिंदे, पोकॉ खंडाप्पा हत्ताळे यांनी सदर गुन्ह्याचे तपास कामी मदत केली आहे.