युवकांच्या जीवावर भारताची महासत्तेकडे वाटचाल..
_____________________________________________________
मंगळवेढा;(प्रतिनिधी) : सध्याच्या काळात युवकांच्या जीवावर भारताची महासत्ता बनण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन आ. समाधान भारताची महासत्ता बनण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन आ.समाधान आवताडे यांनी व्यक्त केले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या १८ युवा महोत्सवाचे येथील दलित कदम शास्त्र महाविद्यालयात उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू मृणालिनी फडणवीस या होत्या.
व्यासपीठावर मा.आ.प्रशांत परिचारक,पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते,संस्थाध्यक्ष अँड सुजित कदम,दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील,धनश्री परिवाराचे शिवाजी काळुंगे,शोभा काळुंगे,मीनाक्षी कदम, तेजस्विनी कदम,प्रियदर्शनी महाडिक,प्र.कुलगुरू राजेश गादेवार,वित्त लेखाधिकारी श्रेणिक शहा,डाॅ विश्वनाथ आवाड, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे, शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्रीधर भोसले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते दलित मित्र कदम गुरुजी यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना आ. आवताडे म्हणाले की विद्यार्थ्यांच्या कला,सुप्त कलागुणांचे व्यासपीठ म्हणजे युवा महोत्सव असून या महोत्सवातून अनेक कलाकार घडत असतात.या महोत्सवातून चांगले गुण घेऊन जावा.
महोत्सवातून यशस्वी विद्यार्थ्याला त्याच्या पुढील आयुष्यात काही कमी पडत नाही. मा. आ. प्रशांत परिचारक म्हणाले की तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नाने फक्त एका जिल्ह्यासाठी सोलापूरात विद्यापीठ स्थापन केले असून हा युवा महोत्सव घ्यावा म्हणून विद्यापीठाला महाविद्यालयांना आग्रह करावा लागतो परंतु युवा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुप्त कलागुण लोकांसमोर मांडले जातात साहित्य, संगीत, कला यामधून माणूस तयार होतो याप्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते म्हणाल्या की शैक्षणिक करिअरमध्ये विद्या युवा महोत्सवाच्या माध्यमातून नवीन उर्जा देत असतो.
महोत्सवानंतर विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्यावे अध्यक्षपदावरून बोलताना कुलगुरू फडणवीस म्हणाल्या की दोन वर्षानंतर होणाऱ्या युवा महोत्सवाच्या माध्यमातून चांगला युवक तयार होत असून महोत्सवासाठी विद्यापीठाने व महाविद्यालयाने चांगले कष्ट घेतले आहे २६ कला प्रकाराबरोबर स्थानिक कलाकृतीला व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. विद्यापीठाने ललित कला विभाग सुरू केल्याने परदेशी विद्यार्थी शिकण्यासाठी विद्यापीठात येऊ लागले.प्रास्तावित विद्यापीठाच्या विद्यार्थ्यी विकास संचालक डाॅ केदारनाथ काळवणे म्हणाले की,कोरानामुळे दोन न झालेला युवा महोत्सवात यंदा ७०० विद्यार्थी व ६०० विद्यार्थीनी सहभागी झाले असून राज्यभरातील ४० परीक्षक आहे.सुत्रसंचालन यशपाल खेडकर,अश्फाक काझी यांनी केले. उपस्थिताचे आभार अँड. सुजित कदम यांनी मांडले