सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील आज पासून दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) : राज्याचे महसूल पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील हे पंढरपूरच्या आषाढी वारी व्यवस्था व नियोजनाचा वारीच्या आढावा घेण्यासाठी दोन दिवस सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे गुरुवार दिनांक ८ रोजी दुपारी ३:०० वाजता वालचंद नगर येथून मोठा लेणी नातेपुते तालुका माळशिरस कडे प्रयाण करतील दुपारी ३/३० वाजता संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी थांबा नातेपुते येथे आगमन होणार असून संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी स्थळाची रिंगण व्यवस्थेची पाहणी व अधिकारशी चर्चा करणार आहेत. सायंकाळी ६/३० वाजता के. बी .पी कॉलेज पंढरपूर आषाढी वारी नियोजनाबाबत आढावा बैठक ८/३० वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आगमन व दर्शन रात्री शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे मुक्काम व शुक्रवारी पंढरपूर शहर नगरपालिका ग्रामीण वारी निमित्त केलेल्या तयारीची पाहणी करणार आहेत .असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहेत.