नवीन लाईट मिटर घेवून देण्याच्याखाली फसवणूक करणारा ताब्यात...

नवीन लाईट मिटर घेवून देण्याच्याखाली फसवणूक करणारा ताब्यात...

----------------------------------------------------------------------------------
पुणेः सामान्या नागरीकांना नवीन लाईट मिटर घेवून देतो असे सांगून पैश्यांची फसवणूक करून फरार झालेल्या आरोपीला काही तासात गजाआड करण्यात युनिट-१, गुन्हे शाखेला यश आले आहे.
----------------------------------------------------------------------------------

पुणे; प्रतिनिधी : नविन लाईट मिटर घेवून देतो असे सांगून त्याबदल्यात रक्कम स्विकारून लाईट मीटर घेवून दिले नाही म्हणून रज्जाक इसाक सय्यद (रा. महात्मा फुले पेठ, पुणे) यांनी नितीन रमेश नाईक (वय ४९ वर्ष रा महात्मा फुले पेठ, पुणे) याचे विरूध्द कोंढवा पोलिस ठाणे येथे तक्रार दिल्याने सदरबाबत दिनांक १०/११/२०२२ रोजी गु र नं १११२/२२, भादवि कलम ४२०,४०६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गुन्हे शाखा युनिट -१ चे अधिकारी व अंमलदार असे वरिष्ठांचे आदेशाने दाखल गुन्ह्यातील पाहिजे/फरारी आरोपींचा शोध घेत असताना युनिट - १ कडील पोलिस अंमलदार यांना त्यांच्या बातमीदारामार्फत काही तासातच खबर मिळाली की, संदर्भीय दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी नितीन रमेश नाईक (वय ४९ वर्ष रा महात्मा फुले पेठ,पुणे) हा हत्ती गणपती सदाशिव पेठ, पुणे येथे येणार आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने हत्ती गणपती सदाशिव पेठ, पुणे येथून त्यास ताब्यात घेवून पुढील कार्यवाही साठी कोंढवा पोलिस ठाणे कडील पोलिसांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, संदीप कर्णिक पोलिस सह आयुक्त पुणे शहर, रामनाथ पोकळे अपर पोलिस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्रीनिवास घाडगे पोलिस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे, गजानन टोम्पे, सहाय्यक पोलिस आयुक्त, गुन्हे - १, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-१ कडील पोलिस निरीक्षक संदीप भोसले, सहा पोलिस निरीक्षक आशिष कवठेकर,पोलिस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार व तुषार माळवदकर यांनी केली.