सोलापूर कारागृहात शौचालयात आढळले दोन मोबाईल कर्मचाऱ्यांचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर!

सोलापूर कारागृहात शौचालयात आढळले दोन मोबाईल कर्मचाऱ्यांचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर!

------------------------------------------------------------------------------------
तब्बल दोन महिन्यानंतर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
------------------------------------------------------------------------------------

सोलापुर( दै. पंढरी नगरी न्यूज): सोलापूर जिल्हा कारागृहाच्या बॅरेक क्रमांक एकच्या बाहेरील शौचालयातील दाराच्या बाजूस लाकडी चौकटीवरील भिंतीत एक मोबाईल व कारागृहातील हॉस्पिटल विभागाच्या वापरात नसलेल्या शौचालयात काळ्या चिकटपट्टीमध्ये गुंडाळलेल्या स्थितीत एक मोबाईल असे दोन मोबाईल आढळून आले.

ही घटना दि.२२सप्टेंबर रोजी उघडकीस आली असून कैदी दिलीप तायप्पा जगले याच्याविरुद्ध न्यायालयाच्या परवानगी नुसार तब्बल दोन महिन्यानंतर जेलरोड पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई हरिश्चंद्र महादेव राऊत यांनी हा गुन्हा दाखल झाला आहे.