पिंपरीमध्ये चंद्रकांत पाटलांवर शाई फेक

पिंपरीमध्ये चंद्रकांत पाटलांवर शाई फेक

------------------------------------------------------------------------------------

पिंपरी चिंचवड;( दै. पंढरी नगरी न्यूज) : केवळ सरकारी अनुदानावर विसंबून राहू नका, असे आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी संस्थांना केले. ते म्हणाले की, देशात सध्या सर्व सरकारनेच करावे, अशी भावना निर्माण झालीय.यापूर्वी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांनी शाळा काढल्या. त्यासाठी सरकारी अनुदान घेतले नाही. भीक मागून शाळा उभ्या केल्या, असे वक्तव्य त्यांनी केले.

भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये शाई फेक करण्यात आली आहे. पाटलांनी काल महात्मा फुलेंबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळीच दिलगिरी व्यक्त केली होती त्यानंतर त्यांचावर शाईफेक करण्यात आली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक करणारे कार्यकर्ते कोणत्या संघटनेचे आहेत, याबद्दल अजून माहिती समोर आली नाही.

केवळ सरकारी अनुदानावर विसंबून राहू नका, असे आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी संस्थांना केले. ते म्हणाले की, देशात सध्या सर्व सरकारनेच करावे, अशी भावना निर्माण झालीय. यापूर्वी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांनी शाळा काढल्या. त्यासाठी सरकारी अनुदान घेतले नाही. भीक मागून शाळा उभ्या केल्या, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवतेय. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. औरंगाबादमध्ये प्रकरणी आंदोलनही करण्यात आले.