वाखरीतील ५२ एकर शेतजमिन घोटाळ्या प्रकरणी न्यायालयाचे चौकशीचे आदेश

वाखरीतील ५२ एकर शेतजमिन घोटाळ्या प्रकरणी न्यायालयाचे चौकशीचे आदेश

-----------------------------------------------------------------------------------

पंढरपूर ( दै.पंढरी नगरी न्यूज) पंढरपूर शहरालगत व पालखी महामार्गावरील वाखरी ग्रामपंचायत येथिल माने - कैकाडी कुटूंबीयांच्या ५२ एकर शेतजमिनीचा व्यवहार २००७ साली मे.छोरिया प्रॉपर्टीज अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट कंपनीचे भागीदार कन्हैयालाल देवीचंद जैन रा.जळगाव यांच्याशी झाला होता. परंतु सदर व्यवहारामध्ये जैन यांनी आपली व आपल्या कुटूंबीयांची फसवणूक केल्याची तक्रार अनंता बाबुराव माने- कैकाडी यांनी पोलीस व महसुल विभागात केली होती.

त्यामध्ये माने- कैकाडी यांचा कन्हैयालाल जैन यांच्यावर असा आरोप होता की सदर शेतजमिन खरेदी व्यवहारावेळी जो दस्त जैन यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चलन भरण्यासाठी नोंदवला त्या दस्तामधिल ९ नऊ नं पान बदलून तोच दस्त जैन यांनी पंढरपूर तहसिल मधिल दुय्यम निबंधक कार्यालय येथे जमा केला व आमची फसवणूक केली सोलापूर येथे चलन भरतेवेळी जो संबंधित दस्त दिला होता तोच दस्त त्यांनी आम्हास वाचण्यासाठी दिला होता व त्याच दस्तामधिल पान नं ९ मध्ये पहिल्याच पॅरेग्रॅपमध्ये असे नमूद होते की जर शेतजमिन व्यवहारामधिल जमिन घेणार यांनी जमिन देणार यांना जे दस्तामध्ये लिहून दिलेले रकमेचे चेक जर वटले नाहीत तर संबंधित व्यवहार रद्दबादल ठरवण्यात येईल परंतु नेमके हाच मजकूर असलेले ९ नंबर पान पंढरपूर तहसिल येथिल दुय्यम निबंधक कार्यालय येथे दस्त करतेवेळी बदलून त्यामध्ये असा उल्लेख केला गेला की जर जमिन घेणार यांनी जमिन देणार यांना दिलेले चेक जमिन देणार यांच्याकडून किंवा त्यांच्या नातेवाईक यांच्याकडून कोणताही न्यायालयीन वादविवाद करण्यात आला तर व्यवहारातील चेक थांबवले जातील अशा अशयाचा मजकूर त्या बदललेल्या पान नं ९ वर जैन यांनी केल्याचा आरोप माने- कैकाडी यांनी केला व नंतर त्यांनी पंढरपूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे वकिलामार्फत महसुली दावा केला व या महसुली दाव्यामध्ये जैन व माने- कैकाडी या दोन्ही बाजूंचा त्यांच्या मार्फत त्यांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद व पुराव्यांच्या आधारे पंढरपूर उपविभागीय अधिकारी यांनी संबंधित झालेल्या व्यवहारामध्ये दस्तातील पान नं ९ चा दाखला देत प्रकरणाचा निकाल माने-कैकाडी यांच्या बाजूने दिला व त्यानंतर प्रांताधिकारी यांनी निकालाची संबंधित प्रत मंडल अधिकारी व तलाठी यांना पाठवण्याच्या सुचना करत अपिल वेळ संपल्यानंतर सदर व्यवहाराचा फेरफार रद्दबादल करण्याचे आदेश दिले.

परंतु त्यानंतर संबंधित प्रकरण महसुल व फौजदारी यामध्ये अधिक गुंतागुंतीचे होत गेले त्यास १६ वर्षे पुर्ण झाले ते अजूनही सुरूच आहे .तद्पर सागर माने-कैकाडी यांनी सदर शेतजमीन व्यवहारातील दस्तामध्ये फेरफार झाल्याचे दिसून येत असल्याचा आरोप करीत पंढरपूर जिल्हा व सञ न्यायालय येथे याबाबत संबंधित फेरबदल असलेले दोन दस्त पुरावा म्हणून सादर करत दावा दाखल केला व या सदर दस्तांमधिल ९ नं पान व सही शिक्के फोटो यांसह आदी बदल याची पोलीसांमार्फत चौकशी करण्यात यावी अशी न्यायालयाकडे मागणी केली.

न्यायालयाने माने- कैकाडी यांची मागणी मान्य करत छोरिया प्रॉपर्टीज अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट कंपनीचे भागीदार कन्हैयालाल देवीचंद जैन व इतर यांची संबंधित बनावट व फेरफार केलेले दस्त जैन यांनी अस्तित्वात आणले का याची गांभीर्यपूर्वक व सदर घटना गंभीर स्वरूपाची असल्याने सदर ऑर्डर दाखल करून घेण्याचा आदेश न्यायालयाने पंढरपूर शहर पोलीस स्टेशन यांना दिलाचे न्यायालयाच्या अपिलातील निकालामध्ये नमूद असल्याचे दिसुन येत आहे.