मंगळवेढ्याच्या डीवायएसपी पदाचा पदभार विक्रांत गायकवाड यांनी स्विकारला ; सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यावर भर देणार.

मंगळवेढ्याच्या डीवायएसपी पदाचा पदभार विक्रांत गायकवाड यांनी  स्विकारला ; सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यावर भर देणार.

---------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा (पंढरी नगरी न्यूज ) : मंगळवेढ्याचे विक्रांत हिम्मतराव गायकवाड यांनी आपल्या पदाची नुकताच पदभार स्वीकारला असून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे माहिती पंढरी नगरी न्युज चॅनेल ला  दिली.

मंगळवेढ्याच्या विद्यमान डीवायएसपी राज्यश्री पाटील यांची बदली पुणे येथे वनी अन्वेषण शाखेकडे झाले असून त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात आले आहे .त्यांच्या रिक्त जागेवर धर्माबाद जिल्हा नांदेड येथून विक्रांत गायकवाड आले असून मंगळवेढ्याचे ते १० वे. डीवायएसपी म्हणून त्यांनी आपल्या पदाचा नुकताच पदभार स्वीकारला आहे. ते मूळचे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भाट निमगाव येथील रहिवासी असून ते २०१६ साली पोलीस सेवेत दाखल झाले आहेत. त्यांनी आतापर्यंत गडचिरोली ,नांदेड येथे चांगल्या प्रकारची सेवा बजावली असल्याचे सांगण्यात आले. नूतन डी वाय एस पी विक्रांत गायकवाड हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून पोलीस दलात त्यांची ओळख निर्माण झाली आहे.