तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत सिद्धेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधव- नागणेवस्ती शाळेचे यश.

तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत सिद्धेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधव- नागणेवस्ती शाळेचे यश.

----------------------------------------------------------------------------------- 
   
पंढरपूर (पंढरी नगरी न्युज)विद्यार्थी व्यक्तीमत्त्व सोध चाचणी 2023 अंतर्गत तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी केंद्रातील जाधव-नागणेवस्ती शाळेची विद्यार्थिनी कु. पल्लवी कुमार कुरे हिने तृतीय क्रमांक पटकावला. त्याबद्दल शाळेच्या वतीने तिचा स्वागत करून सत्कार करण्यात आला.

तालुका स्तरावरील प्रमाणपत्र, चित्रकला वही आणि मोठा रंगखडू बॉक्स असे बक्षीस देऊन शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा रेखा जाधव, सदस्या सुप्रिया धुरुपे,  भाग्यश्री जाधव यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. मार्गदर्शक शिक्षिका  तेजस्विनी घोडके यांचेही अभिनंदन करण्यात आले. यावेळी नवनाथ धुरूपे उपास्थित होते. सर्वांचे स्वागत आणि आभार केंद्रीय मुख्याध्यापक एम. बी.जाधव केले.