उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा - शिव - शाहू - फुले - आंबेडकर एकता मंचाची जोरदार मागणी..!

उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा - शिव - शाहू - फुले - आंबेडकर एकता मंचाची जोरदार मागणी..!

----------------------------------------------------------------------------------

शिरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज) : देशाला प्रबोधनाची दिशा देणाऱ्या महाराष्ट्रातील  महापुरुषांची प्रशासनासह  मंत्रिमंडळातील उच्चपदस्थांकडून जाणूनबुजून बदनामी केली जात असून, त्यात सहभागी झालेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी येथील फुले शाहू आंबेडकर एकता मंचा तर्फे करण्यात आली.

चंद्रकांत पाटलांनी सांगितला 'तो' प्रसंग शहरातील वरवाडे येथील महात्मा फुले पुतळ्यासमोर मंगळवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आत्मक्लेश आंदोलन केले. त्यानंतर तहसीलदार आबा महाजन, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ए. एस. आगरकर यांनी आंदोलनस्थळी जाऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून दोन्ही अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षक महात्मा ज्योतीबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या अवमानकारक विधानांमधून बहुजन जनतेच्या भावना हेतुपुरस्सर दुखावण्याचे काम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे, अशी टिका यावेळी करण्यात आली.

राज्यात निषेध नोंदविणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा अनिष्ट पायंडा त्यांनी पाडला आहे. ते खोटे गुन्हे मागे घेऊन राज्यपाल कोश्यारी व मंत्री चंद्रकांत पाटील यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी रवींद्र (पिंटू) माळी, पिंटू शिरसाठ, वासुदेव देवरे, विनायक वाघ, बापू खैरनार, भालेराव माळी, गंभीर मंगळे, रामभाऊ कढरे, प्रकाश पवार, अनिल थोरात, काशीराम माळी, जितेंद्र सोनवणे, सतीश पाटील आदींनी निवेदनातून केली. शाहीर प्रवीण पानपाटील यांनी पथकासह गीत सादर करून कोश्यारी व चंद्रकांत पाटील यांचा निषेध केला.