राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची हकालपट्टी करा, स्वराज्य संघटना व छावा क्रांतिवीर सेनेने केली मागणी,

राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची हकालपट्टी करा, स्वराज्य संघटना व छावा क्रांतिवीर सेनेने केली मागणी,

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै .पंढरी नगरी न्यूज) :  स्वराज्य संघटना व छावा क्रांतिवीर सेना वतीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना हटवावे अशी मागणी साठी पंढरपूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्यपाल पदावर नियुक्त झालेपासून महाराष्ट्र राज्य, महापुरूष व महाराष्ट्र राज्याची अस्मिता यांबाबत वारंवार वादग्रस्त व अवमानकारक वक्तव्ये करीत आहेत.

आपल्या भाषणांतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करून त्यांनी महाराष्ट्राच्या उज्ज्वल इतिहासाची विटंबना केली आहे. नुकतेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अत्यंत अवमानकारक वक्तव्य करून महाराष्ट्राच्या जनतेच्या भावनेशी खेळ केलेला आहे.

यापूर्वी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबाबत पातळीहीन वक्तव्य करून या महान दाम्पत्याच्या कार्याची अवहेलना केली आहे.

आपल्या माध्यमातून राष्ट्रपती  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदनात, कोश्यारी यांना वेळीच आवर घालून महाराष्ट्राचे राज्यपाल पदावरून त्यांची ताबडतोब हकालपट्टी करावी. अन्यथा महाराष्ट्रातील जनतेच्या भावनेचा मोठा उद्रेक होण्याची वाट पाहू नका.सदर निवेदनाची दखल घ्यावी भगतसिह कोश्यारी यांना तात्काळ राज्यपाल पदावरून हटवावे अन्यथा महाराष्ट्रात जनआंदोलणाच्या माध्यमातून जे काही परिणाम होतील यास सर्वस्वी जबाबदार  मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री शासन प्रशासन  यांच्यावर राहील असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी यावेळी  छावा क्रांतिवीर सेना पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष गणेश माने.पंढरपूर तालुकाध्यक्ष नवनाथ बागल. छावा चित्रपट आघाडी पंढरपूर तालुकाध्यक्ष नवनाथ गोडसे. भंडीशेगाव ग्रामपंचायतचे ग्रा.सदस्य मंगेश ननवरे. अविनाश ताकतोडे. बाबासाहेब गायकवाड.कल्याण ननवरे. महेश काळे.आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.