पंढरपूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग झाला झिरो कर्मचारी मुक्त

पंढरपूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग झाला झिरो कर्मचारी मुक्त

--------------------------------------------------------
परंतु पुरवठा निरीक्षक कारवाई विना मोकाटच
---------------------------------------------------------
पंढरपूर( दै. पंढरी नगरी न्यूज )पंढरपूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात असलेल्या झिरो कर्मचारी अखेर हकलपट्टी करण्यात आली असून हा विभाग झिरो कर्मचारी मुक्त झाला असून महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी पुरवठा निरीक्षकावर कारवाई कधी करणार याकडे पण पंढरपूर तालुक्यातील रेशन धान्य दुकानदाराचे लक्ष लागले आहेत तालुक्यातील ७६४अंत्योदय कार्ड व तीन हजार ९५३इतक्या अनुस सुरक्षा योजनेतील कार्डावरील २८ हजार ६४०लाभार्थ्याचे नुकसान या झिरो कर्मचाऱ्यामुळे झाल्याचा दावा रेशन धान्य दुकानदार ने केला आहे रेशन कार्ड रद्द झाल्याने दुकानदारांना मिळणारी कमिशन तसेच नागरिकांना मिळणाऱ्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे आणि दिवाळीत शासनाचा आनंदाचा शिधाही गरिबांना मिळाला नाही झिरो कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या पुरवठा निरीक्षकांना मात्र याचे कोणतेही सुखदुःख नसल्याचे दिसून येते कमी झालेल्या अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यामुळे दुकानदार व ग्राहक यांच्यात शाब्दिक चकमकी होऊन यातून तक्रारी होत आहेत .आता पुरवठा विभाग झिरो कर्मचारी मुक्त झाला असला तरी नवीन ऑपरेटरच्या त्वरित नेमणुका करून दुकानदाराचा वाढवावा अशी मागणी होत आहे .संघटनेचे संपर्कप्रमुख नितीन पेंटर म्हणाले की फोन पे व गुगल पे वरून दुकानदारात कडून पुरवठा निरीक्षकांनी दरमहा रक्कम घेतली आहे. ही बाब गंभीर असून याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी पंढरपुरातच सर्वाधिक रेशन कार्ड बद्दल आधार जोडणी केली नसल्याने संपूर्ण जिल्ह्यात केवळ पंढरपूर तालुक्यातीलच सर्वाधिक रेशन कार्ड रद्द झाली आहे. गेल्या ८ ते १० वर्षापासून पंढरपूर कार्यालयात ठोकून असलेल्या झिरो कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत काय ?केले असा सवाल रेशन धान्य दुकानदार ने विचारला आहे .पुरवठा निरीक्षकांनी मनात आकास ठेवून पंढरपुरात एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई केल्याचा आरोप ही संघटनेने केला आहे. झिरो कर्मचाऱ्यांबरोबरच मोकाट असणाऱ्या पुरवठा निरीक्षकावरही त्वरित कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे.