देवडे येथील शेतकऱ्याच्या शेतातील झाडावर वीज कोसळली, मोठ्या आवाजाने नागरिक घाबरले

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर तालुक्यातील देवडे येथे वादळी वाऱ्यासह व विजेच्या कडकडाट पाऊस पडल्याने येथील शेतकरी विश्वनाथ शिंदे या शेतकऱ्याच्या घरासमोर असलेल्या नारळाच्या झाडावर विज कोसळून झाडाचे नुकसान झाले असून मोठा आवाज आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते.

देवडे येथे गुरुवार दि. 16 रोजी वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात होवून सायंकाळी 5 वाजता शेतकरी विश्वनाथ शिंदे यांच्या शेतातील नारळाच्या झाडावर वाऱ्यासह विजेचा मोठ्याने आवाज होऊन विज कोसळून नारळाच्या झाडावर पडल्याने झाड जळून खाक झाले असून झाडाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र कोणीही जिवित व प्राणहानी झाली नसल्याचे आमच्या प्रतिनिधीकडून सांगण्यात आले.