ईश्वर वठार येथे मतदार यादीच्या कारणावरून एकावर खूनी हल्ला..!
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै पंढरी नगरी न्युज) : पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार या गावातील मतदार यादीत असलेल्या नावाबद्दल हरकत घेतल्याच्या कारणावरून दगड आणि लाथा बुक्क्यांनी आणि मारहाण करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना ईश्वर वठार मध्ये घडल्याने गाव व परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी पहाटेच्या वेळी आहे.
या प्रकरणात पंढरपूर तालुका पोलिसांनी पोलीस ठाण्यात दोघाविरुद्ध दगड व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ज्ञानेश्वर गुंडगे वय ४० राहणार ईश्वर वठार अशी जखमीचे नाव आहे. त्यांना गंभीर अवस्थेत पंढरपुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .या प्रकरणात पोलिसांनी पंचायत समितीचे माजी सदस्य औदुंबर धोंडीबा मेटकरी व संजय लक्ष्मण सरवदे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .या संदर्भात जखमीची पत्नी रेखा न्यानेश्वर गुंडगे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून गावच्या मतदार यादीत काही लोकांची नावे ही आसपासच्या तसेच आमच्या गावातील मतदार यादीत असल्याने त्यांची हरकत त्यांची पती ज्ञानेश्वर गुंडगे यांनी घेतली होती.
त्यावेळी दोघांनी मिळून त्यांना मारहाण करीत खाली पाडले आणि मतदार यादी बद्दल हरकत घेतो काय ? तुला खलास करतो असे म्हणत त्यांच्या पोटावर आणि डोक्यावर दगडाने मारहाण केली. भांडण सोडवण्यास आल्यानंतर त्यांना व त्यांच्या विवाहित मुलीला ढकलून दिले अशी पत्नी रेखा ज्ञानेश्वर गुंडगे अशी फिर्याद पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.