जकराया शुगर हा ऑरगॅनिक कार्बनयुक्त पी .डी .एम पोटॅश खताची निर्मिती करणारा राज्यातील १ कारखाना ." जकराया शुगरची, कारखानदारीत गरुड झेप

जकराया शुगर हा ऑरगॅनिक कार्बनयुक्त पी .डी .एम पोटॅश खताची निर्मिती करणारा राज्यातील १  कारखाना ." जकराया शुगरची, कारखानदारीत गरुड झेप

---------------------------------------------------------------------------------

मोहोळ (पंढरी नगरी न्यूज ) : उपपदार्थ निर्मितीचे वेगवेगळे प्रकल्प यशस्वी करून दाखवीत साखर कारखानदारीत यशाची नवनवी शिखरे पादाक्रांत करणाऱ्या मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया साखर कारखान्याने केंद्र सरकारच्या धोरणाला अनुसरून आता ऑरगॅनिक कार्बनयुक्त पीडीएम पोटॅश खताची निर्मिती सुरू केली आहे. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अॅड.बी.बी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या खाताची निर्मिती करणारा जकराया हा राज्यातील पहिला साखर कारखाना ठरला आहे. वाढत्या मागणीचा विचार करून कारखाना लवकरच पीडीएम पोटॅश दाणेदार खताची निर्मिती करणार असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना जाधव म्हणाले की, केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देऊन या उत्पादनाला देशातच मोठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पथदर्शी निर्णय घेतले आहेत. इथेनॉलच्या विक्रीतून येणारा पैसाकारखाण्यामार्फत थेट शेतकऱ्यांच्या खिशात जाणार आहे. याचा फायदा कारखानदारांबरोबरच शेतकऱ्यांनाही होणार आहे. देशांतर्गत इथेनॉलच्या निर्मितीला प्रोत्साहन देऊन परदेशातून पेट्रोलची आयात कमी करण्याचे शासनाचे धोरण आहे.

●खताची निर्मिती करणारा राज्यातील पहिला साखर कारखाना●

रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनीचा पोत खराब होऊन जमिनी नापिकी होण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर वेळीच तोडगा नाही काढला तर भविष्यात शेतकरी उध्वस्त होण्याची शक्यता आहे. सद्या आपल्या देशाला पोटॅश हे मोठ्या प्रमाणात आयात करावे लागते. पोटॅशची आयात कमी करून पीडीएम पोटॅश निर्मितीचा कार्यक्रम केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणावर राबवायचा आहे. त्याचाच एक भाग म्हणून जकराया साखर कारखान्याने ऑरगॅनिक कार्बन युक्त पीडीएम पोटॅश खताची निर्मिती सुरू केली आहे. या खतामुळे जमिनीचा पोत सुधारून ती पिकावू होते. वाढत्या मागणीचा विचार करून जकराया कारखाना लवकरच पीडीएम पोटॅश दाणेदार खताची निर्मिती करणार असल्याच जाधव यांनी सांगितले. जकरायाचा हा पथदर्शी प्रकल्प असून हा प्रकल्प राबविणारा राज्यातील पहिलाच कारखाना ठरला आहे. त्यामुळे राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरच्या विपणन विभागाचे मुख्य व्यवस्थापक विलास पाटील, पुणे परिमंडळ मुख्य व्यवस्थापक दीपक कुंजीर, सोलापूरचे व्यवस्थापक कैलास घोलप, कृभकोचे व्यवस्थापक आशिष उमप यांनी कारखाण्याच्या या प्रकल्पाला भेट दिली. त्यांच्या देशभरातील वितरण यंत्रणेमार्फत जकराया शुगरने उत्पादित केलेले हे खत देशातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे सचिन जाधव यांनी सांगितले.

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष ॲड.बी.बी. जाधव, पूर्णवेळ संचालक राहुल जाधव, रफिक पाटील, चंद्रकांत सरवळे, भानुदास गावडे, मुख्य शेती अधिकारी नानासाहेब बाबर, केन मॅनेजर विजय महाजन, चीफ इंजिनिअर कुबेरदास कलुबर्मे, चीफ अकौंटंट बजरंग जाधव आदी उपस्थित होते.