नवोदय विद्यालयात जागतिक वसुंधरा दिवस व महात्मा बसवेश्वर जयंती साजरी..
___________________________________________________
तुळजापूर (पंढरी नगरी न्यूज) ; जवाहर नवोदय विद्यालयात शनिवार दिनांक २२एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिवस , महात्मा बसवेश्वर जयंती, अक्षय तृतीया व रमजान ईद हे सर्व कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य गंगाराम सिंह व विद्यार्थी यांच्याद्वारे महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक वृंद उपस्थित होता .या वेगवेगळ्या दिनाचे औचित्य साधून मा. सुमित वाघमोडे व अस्मोल गायकवाड या विद्यार्थ्यांनी आपले मनोगते व्यक्त केली.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य गंगाराम सिंह यांनी विश्वामध्ये पृथ्वी हा ग्रह कसा महत्त्वपूर्ण आहे हे सांगत असताना या पृथ्वीवरील झाडे ही वसुंधरेची दागिने आहेत. याचे संरक्षण ,संवर्धन करण्यात सांगून पाण्याची बचत करण्याचे आवाहन करून महात्मा बसवेश्वर यांचे कार्य जनतेसाठी कसे महत्त्वपूर्ण होते तसेच महात्मा बसवेश्वर यांनी अनिष्ट रूढी, परंपरा, बालविवाह याला कसा विरोध केला हे सांगून या महान पुरुषांचे गुणांचा अंगीकार स्वीकार करण्याचे आवाहन करून सर्व विद्यार्थ्यांना करून जागतिक वसुंधरा दिन, अक्षय तृतीया, रमजान ईद, महात्मा बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा प्राचार्यांनी दिल्या. जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून याप्रसंगी विद्यालयात कनिष्ठ विभागात घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रथम क्रमांक: आकाशी करंडे व संजना चौगुले, द्वितीय क्रमांक: मंजिरी मुसांडे ,तृतीय क्रमांक: साईश शिंदे यांनी मिळवले. या स्पर्धा घेण्यासाठी श्री चक्रपाणि गोमारे व दिनेश वैरागडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन श्री .हरी जाधव यांनी केले.