नागरिकांनो पावसाळा आला सज्ज रहा ,--- हिवताप टाळण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळा आणि कीटकजन्य आजार टाळा, -- सोलापूर जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांना आवाहन --
------------------------------------------------------------------------------------
सोलापूर(दै.पंढरी नगरी न्यूज) पावसाळ्यात हिवताप डेंगू मेंदूज्वर सारखे आजार साथीच्या स्वरूपात वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे हिवताप प्रतिबंधासाठी नागरिकांनी दर आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी केले आहे. हिवताप डेंगू मेंदूज्वर सारख्या कीटक ज्यांनी आजाराची साथ नियंत्रणासाठी ग्रामपंचायत यांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि जिल्हा हिवताप कार्यालय पंढरपूर यांच्या वतीने डॉ. राधाकिशन पवार सहसंचालक आरोग्य सेवा , डॉ.प्रतापसिंह सारणीकर सहाय्यक संचालक पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या निर्देशनानुसार दरवर्षी जून महिन्यात हिवताप प्रतिरोध महिना राबविण्यात येत असतो. यामध्ये पूर्ण महिनाभर कीटक ज्यांनी आजाराबाबत प्रतिबंधक अभियानाची अंमलबजावणी केली तर आपण हिवताप डेंगू मेंदूज्वर यासारख्या कीटकजन्य आजाराची साथ रोखू शकतो.

या अभियाना अंतर्गत आठवड्यातून एक दिवस कोरडा पाणी पाण्याचे साठे रिकामे करणे ही भांडी घासून पुसून कोरडी केली जातात व घरातील सर्व पाणी साठी कपड्याने झाकून ठेवली जातात यामुळे डासाचा प्रादुर्भाव रोखण्यात मदत होते असे जिल्हा हिवताप अधिकारी विजय बागल यांनी सांगितले.
दरवर्षी जून महिन्यामध्ये पाऊस कमी जादा प्रमाणात पडत असतो त्यामुळे डासांना पोषक वातावरण तयार होते परिणामी डासाची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असते. या डासामुळे आणि पावसाळ्यातील दूषित पाण्यामुळे कीटकजन्य आणि जलजन्य आजार उद्भवू शकतात. या जलजन्य आणि कीटकजन्य आजारांना आळा घालण्यासाठी आपले घर आणि घराच्या परिसरातील सर्व पाणी साठी रिकामे करणे ,गच्चीवरील भंगार साहित्यांची विल्हेवाट लावणे, अनावश्यक टायरची विल्हेवाट लावणे ,फ्री च्या पाठीमागील पाणी रिकामे करणे, कुलर मधील पाणी चार दिवसातून खाली करणे, पिण्याचे पाणी साठी झाकून ठेवणे, संडासच्या व्हेंटिलेटर पाईपला जाळी बसवणे, खिडक्यांना सावधाने लावणे ,अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळे कीटकजन्य आजारावर आपण नियंत्रण मिळू शकतो. त्याचप्रमाणे जिथे साठलेल्या पाण्याची टक्के वापरात नसलेली पडकी विहीर मोठाले हौद यामध्ये गप्पी मासे सोडल्यामुळे सुद्धा डास उत्पत्ती रोखू शकतो. यावर्षी जानेवारी 24 ते मे 24 अखेर ग्रामीण भागामध्ये डेंगू चे २०७ रक्तजन नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात आले होते .यामध्ये 53 डेंगू दूषित रुग्ण आढळून आले. शहरी भागामधील 78 रक्तजन नमुने डेंगू साठी पाठवले असता 21 नागरिकांना डेंगूची लागण झाली असे निदर्शनास आले आहे. हे सर्व ग्रामीण व शहरी भागातील डेंगू रुग्ण बरे झालेले असून नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.
नागरिकांना आवाहन करण्यात येते की सर्वांनी आपापल्या घराचा परिसर आपल्या घरातील पाणीसाठे आठवड्यातून एकदा रिकामी करून स्वच्छता ठेवावी जेणेकरून डास उत्पत्तीस आळा बसेल. यामुळे आपल्याला आपल्या गावाला तालुक्याला कीटकजन्य आजारापासून सुरक्षा मिळेल. सध्या आरोग्य कर्मचारी तसेच आशाताई कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करत असून नागरिकांनी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना आशाताई यांना या कामात मदत करावी आणि सांगितलेले आरोग्य बाबतच्या सूचना अंमलात आणाव्यात असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.