पुणे येथे पोलिस कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या
------------------------------------------------------------------------------------
पुणे :( दै.पंढरी नगरी न्यूज) ऑनलाइन रात्री ड्युटीवर असताना खडक पोलीस स्टेशन अंतर्गत लोहियानगर पोलिस चौकीच वरती असलेल्या रेस्टरूममध्ये पोलिस कर्मचाऱ्याने गोळी झाडून आत्महत्या केली.शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.
भारत दत्ता आस्मर असे पोलिस कर्मचाराचे नाव आहे. आस्मर यांनी CR Mobile 1 वरील कार्बाईनने चार राउंड फायर करत आत्महत्या केली आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.