मुंढेवाडी येथील भीमा नदीच्या पात्रातील होडीवर जेसीबी फिरवला पोलीस व महसूल विभागाची कारवाई तर गुरसाळेत वाळूमाफीयाकडे काना डोळा

मुंढेवाडी येथील भीमा नदीच्या पात्रातील होडीवर जेसीबी फिरवला पोलीस व महसूल विभागाची कारवाई तर गुरसाळेत वाळूमाफीयाकडे काना डोळा

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज) : पंढरपूर तालुक्यातील मुंढेवाडी येथील भीमा नदीच्या पात्रातील वाळू उपसा व वाळू वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन होड्या फोडून महसूल व पोलीस प्रशासने वाळू जप्तीची कारवाई केली मात्र गुरसाळे तालुका पंढरपूर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे दरवाजे वाळू तस्करांनी वाळू चोरी करण्याकरता काढल्याने मोठ्या प्रमाणात पाणी होऊन गेले आहे.

त्यामुळे तालुक्यातील आठ गावाचा शेतीचा पाण्याचा तसेच पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होणार असल्याने त्याचे सोयर सुतक कोणाला पडले आहे. महसूल विभाग याकडे मात्र कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. तेथे मात्र कारवाई न करता सवलत दिली असल्याची चर्चा होत आहे पंढरपूर शहर व तालुक्यातील वाळू तस्कर हे मजोर झाले असून ते उन्माद पणाने वागत आहेत, वाळूची तस्करी करण्याकरता  महसूल विभाग सहकार्य करीत असल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याचे दिसत आहे ,कारण एकीकडे कारवाई केल्याचा दिखावा दाखवायचा आणि दुसरीकडे वाळू तस्करांना सवलत देऊन सोडून त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे हा नियम महसूल विभाग करीत असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे .त्यामुळे मी मारल्यासारखे कर तू रडल्यासारखे करतो अशी मन महसूल विभागाकडून होत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

मुंढेवाडी येथील खटकाळे वस्ती येथे विनापरवाना वाळू उत्खनन होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी याबाबतची माहिती महसूल विभागाला दिली .पोलीस प्रशासन व महसूल कर्मचाऱ्यांची पथके या ठिकाणी कार्यवाहीसाठी गेले असता नदीपात्रात दोन होड्यांमध्ये पाच ब्रास वाळू मिळून आली नदी नदीच्या पात्रातील वाळूत खणन करणाऱ्या दोन होड्या जेसीबीच्या साह्याने फोडण्यात आल्या तसेच पाच ब्रास वाळू जप्त करून ती शासकीय गोदामात आणून ठेवली आहे. ही कारवाई पोलीस नाईक सुहास देशमुख, सचिन आटपाडकर, कासेगाव मंडळ अधिकारी बाळासाहेब मोरे तलाठी आर .आर .गुटाळ कोतवाल महादेव खिलारे कोतवाल प्रल्हाद खरे कारवाईसाठी उपस्थित होते.